Nitin Raiker Awarded Bronze Disc Medal Dainik Gomantak
गोवा

Nitin Raiker: अभिमानास्पद! अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर यांना भारत सरकारचा 'ब्रॉन्झ डिस्क मेडल' पुरस्कार जाहीर

Nitin Raiker Awarded Bronze Disc Medal: राज्याच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन व्ही. रायकर यांना भारत सरकारने 'ब्रॉन्झ डिस्क मेडल' पुरस्कार जाहीर केला.

Manish Jadhav

पणजी: राज्याच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन व्ही. रायकर यांना भारत सरकारने 'ब्रॉन्झ डिस्क मेडल' पुरस्कार जाहीर केला. राज्यभरात आग आणि इतर आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येत आहे. 14 ते 20 एप्रिल 2025 या कालावधीत 'अग्निशमन प्रतिबंधक सप्ताहा'दरम्यान या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार रायकर यांना 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त एका विशेष समारंभात प्रदान केला जाईल.

रायकर यांच्या कार्याचा सन्मान

दरम्यान, रायकर यांच्या नेतृत्वाखालील कामगिरीमुळे राज्यातील अग्निशमन दलामध्ये मोठे बदल घडले. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच दलात आधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर सुरु झाला. यामुळे आग विझवण्याची आणि बचाव कार्याची क्षमता वाढली.

याशिवाय, रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली दलाने अनेक मोठ्या आगी आणि नैसर्गिक आपत्त्यांमध्ये (उदा. पूर) महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यासाठी दलाला प्रशिक्षित केले. एवढचं नाहीतर त्यांनी नागरिकांमध्ये आगीपासून बचाव कसा करावा, याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच अग्निशमन दलाची सेवा अधिक प्रभावी झाली.

स्वातंत्र्यदिनी होणार सन्मान

दरम्यान, हा पुरस्कार स्वातंत्र्यदिनासारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय दिना दिवशी प्रदान करण्यात येणार असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. राष्ट्रपतींच्या वतीने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे रायकर यांना मिळालेला हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक कामगिरीचा नव्हे, तर गोवा अग्निशमन दलाच्या कठोर परिश्रमाचा आणि निष्ठेचा गौरव आहे.

भविष्यातील आव्हाने आणि पुढील वाटचाल

या सन्मानामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे, असे मत रायकर यांनी व्यक्त केले. एवढचं नाहीतर त्यांनी हा पुरस्कार आपल्या संपूर्ण टीमला समर्पित केला. रायकर म्हणाले की, "अग्निशमन दलाचे कार्य केवळ आग विझवण्यापुरते मर्यादित नाहीतर प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे (Citizens) प्राण आणि मालमत्ता वाचवणे हे आमचे कर्तव्य आहे. भविष्यातही आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आणि अधिक प्रभावीपणे काम करुन राज्याची सेवा करत राहू." हा पुरस्कार अग्निशमन दलाला अधिक सक्षम बनवण्यासाठी आणि नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: कारमध्ये कोंडले, लाथाबुक्यांनी केली मारहाण; तक्रारदाराची साक्ष देण्यास नकार; खंडणी प्रकरणातील 6 आरोपी निर्दोष

Goa Live News: सत्तारीतील भुईपाल येथे अपहरणाचा प्रयत्न

Goa Politics: '60 वर्षे गोव्यावर ठराविक कुटुंबांचीच पकड! फॅमिलीराज संपवणे गरजेचे'; केजरीवालांनी घेतले भाजप, काँग्रेसवर तोंडसुख

Goa Politics: खरी कुजबुज; तरीही केजरीवालांचे ‘एकला चलो’ का?

Goa: RSSच्या विजयादशमीला मोन्‍सेरात उपस्‍थित! 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले अभिनंदन; उत्पल पर्रीकरांची गणवेशात उपस्‍थिती

SCROLL FOR NEXT