Mapusa Court | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Court: फुटबॉल स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी माजी मुख्यमंत्री यांना परवानगी द्यावी!

Mapusa Court: पासपोर्ट देण्याचा आदेश

दैनिक गोमन्तक

Mapusa Court: सध्या कतार येथे चालू असलेल्या विश्वचषक फुटबॉल (FIFAWorldCup2022) स्पर्धेतील पोर्तुगाल आणि उरुग्वे यांच्यातील सामना पाहण्यासाठी दोहा येथे जाण्यासाठी माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना म्हापसा न्यायलयाने परवानगी दिली असून त्यांचा पासपोर्ट तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्याकडे सुपूर्द करण्याचा आदेश दिला.

कामत यांच्या विरोधात 2015 मध्ये दाखल केलेल्या लुईस बर्जर प्रकरणाची सुनावणी सध्या म्हापसा न्यायालयात चालू असून या प्रकरणात त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करतेवेळी त्यांना त्यांचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करण्याची आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर न जाण्याची अट घातली होती.

हा सामना पाहण्यासाठी आपल्या कुटुंबाबरोबर कामत 26 नोव्हेंबर रोजी कतारला जाणार असून 29 नोव्हेंबर रोजी तिथून परत येणार आहेत. मार्च महिन्यात इंग्लंडमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी आपण सहकुटुंब युकेला जाणार असून 1 ते 18 मार्चपर्यंत आपले वास्तव्य युकेला असणार, असेही कामत यांनी म्हटले आहे.

त्यासाठी व्हिसा मिळविण्याकरता आपल्याला पासपोर्टची वैधता वाढवून घेण्याची गरज असल्याचे कामत यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. कामत यांच्या पासपोर्टची वैधता ऑगस्ट 2023 मध्ये संपत आहे.

तिकिटे सादर करण्याची सूचना

न्यायालयाने त्यांचा पासपोर्ट तात्पुरत्या स्वरूपात मुक्त करताना विदेशात जाण्यासाठी काढलेली तिकिटे, मिळालेला व्हिसा आणि वैधता बदललेल्या पासपोर्टच्या प्रती न्यायालयाला सादर कराव्यात, असे आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT