Goa Dhiryo ban Dainik Gomantak
गोवा

Goa Dhiryo ban: धीरयोला बंदी, तरी झुंजी सुरूच! वार्का व बाणावलीत प्रकारांकडे पोलिसांचे दुर्लक्ष

Bullfights in Varca Benaulim: कोलवा पोलिसांच्या नाकावर टिच्चून रविवारी सायंकाळी फात्राडे-वार्का आणि बाणावली येथे मिळून तब्बल तीन धीरयो यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आल्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: कोलवा पोलिसांच्या नाकावर टिच्चून रविवारी सायंकाळी फात्राडे-वार्का आणि बाणावली येथे मिळून तब्बल तीन धीरयो यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आल्या.

या झुंजी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बघ्यांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, राज्यात धीरयोवर कायद्याने बंदी असतानाही खुलेआम झुंजी आयोजित करण्यात आल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणी कोलवा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता, ‘काहीच घडले नाही,’ असे सांगत पोलिसांनी नेहमीप्रमाणे या प्रकाराकडे कानाडोळा केला. त्यामुळे बंदी असतानाही धीरयो आयोजकांचे मनोबल वाढत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

या धीरयोमध्ये लाखो रुपयांच्या पैजा लावण्यात आल्याची माहिती आहे. धीरयोवर कायद्याने बंदी असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवून अशा झुंजी खुलेआम आयोजित केल्या जातात. या झुंजींसाठी आयोजकांकडून आधीच पोलिसांशी ‘सेटिंग’ केली जात असल्याची चर्चा असून, त्यामुळेच कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

धीरयोदरम्यान यापूर्वी गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. माजोर्डा येथे उधळलेल्या रेड्याने शिंगाने भोसकल्याने राजेश निस्तानी या युवकाचा मृत्यू झाला होता. तर बाणावली येथे एक बैल पळत जाऊन समुद्रात बुडाल्याची घटनाही घडली होती. या घटनांनंतरही धीरयोचे आयोजन सुरूच असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Birthday: कधीकाळी क्रिकेट किट घ्यायलाही नव्हते पैसे, मॅगी खाऊन काढले दिवस; आज टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर! हार्दिक पांड्याचा संघर्षमय प्रवास

Nana Patekar Death: नाना पाटेकर यांचा मृत्यू कशामुळे झाला? गोमेकॉच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Nushrratt Bharuccha Health Update: 'पिक्चर अभी बाकी है…', अपघातानंतर नुसरत भरुचाची पहिली पोस्ट; PHOTO शेअर करत चाहत्यांना दिली हेल्थ अपडेट

Job Scam: 52 लाखांच्या फसवणूक प्रकरणाला नवे वळण! अजित शंखवाळकरचा पोलिस अधीक्षकासोबतचा फोटो चर्चेत

खरी कुजबुज: मुख्यमंत्री देणार 'नवरात्री गिफ्ट'?

SCROLL FOR NEXT