Goa Trip Viral Video: आयुष्यभर कष्ट, दुःख अन् संघर्ष... अखेर आजीचं स्वप्न पूर्ण, नातीनं घडवली पहिली विमान सफर; गोवा ट्रिपचा व्हिडिओ व्हायरल

Grandmother First Flight Goa Trip Viral Video: ईशा नावाच्या एका इन्स्टाग्राम युझरने आपल्या आजीसोबतचा हा भावनिक प्रवास कॅमेऱ्यात कैद केला असून, तिच्या आजीची ही पहिलीच विमानवारी आणि पहिलीच गोवा ट्रिप आहे.
Grandmother First Flight Goa Trip Viral Video
Goa Trip Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Grandmother First Flight Goa Trip Viral Video: अनेकदा घरातल्या वयस्कर मंडळींसाठी आयुष्यातील अगदी साध्या गोष्टी, जसे की विमानातून प्रवास करणे किंवा नवीन शहराला भेट देणे, या अत्यंत मौल्यवान आणि अविस्मरणीय आठवणी बनून जातात. अशाच एका नातीने आपल्या आजीला दिलेल्या सुंदर सरप्राईजचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

ईशा नावाच्या एका इन्स्टाग्राम युझरने आपल्या आजीसोबतचा हा भावनिक प्रवास कॅमेऱ्यात कैद केला असून, तिच्या आजीची ही पहिलीच विमानवारी आणि पहिलीच गोवा ट्रिप आहे. या व्हिडिओमध्ये आजी विमानतळावर फिरताना, पहिल्यांदाच एअरपोर्ट लाउंजचा अनुभव घेताना आणि शेवटी उत्साहाने विमानात बसून प्रवासाचा आनंद घेताना दिसत आहे.

Grandmother First Flight Goa Trip Viral Video
Cricket Viral Video: अशी टीम तुम्ही कधी पाहिली नसेल! खेळाडू कमी पडल्यानं कुत्र्याला घेतलं संघात; मैदानातील व्हिडिओनं वेधलं लक्ष

हा व्हिडिओ शेअर करताना ईशाने लिहिलेले कॅप्शन प्रत्येकाच्या काळजाला भिडणारे आहे. तिने लिहिले की, "काही अनुभव तेव्हा खूप जास्त मौल्यवान ठरतात, जेव्हा ते तुम्ही अशा व्यक्तीला देता ज्याने आयुष्यात कधी विचारही केला नसेल की ती हे कधी अनुभवू शकेल." ईशाने पुढे सांगितले की, तिच्या आजीने यापूर्वी कधीही विमानाने प्रवास केला नव्हता, ती कधी गोव्याला गेली नव्हती आणि आपल्या गावाबाहेर तिने फारसे जग पाहिले नव्हते. तिच्या आजीच्या पिढीने आयुष्यात खूप संघर्ष केला. त्यांच्यासाठी विमानाचे तिकीट काढणे किंवा सुट्ट्या घालवण्यासाठी बाहेर फिरायला जाणे ही कधीच प्राथमिकता नव्हती. कारण कुटुंबाच्या मोठ्या जबाबदाऱ्या आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करणे अधिक गरजेचे होते.

Grandmother First Flight Goa Trip Viral Video
Viral Video: रस्ताच बनला बेडरूम! पाण्यात मच्छरदाणी लावून झोपला तरुण, व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'System Hang Kar Diya'

आता कुटुंबाची परिस्थिती चांगली असल्याने आणि बाहेर फिरणे शक्य असल्याने, तिने आजीला ही सुखद भेट देण्याचे ठरवले. विमानातील पहिला प्रवास आणि पहिली गोवा ट्रिप अनुभवताना आजीच्या चेहऱ्यावरील आनंद अमूल्य होता. आयुष्यभर इतरांचा विचार करणाऱ्या आपल्या आजीला राजकन्येसारखी वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे होते आणि ती खरोखरच या सर्व सुखासाठी पात्र आहे, असे ईशाने म्हटले. तिने सोशल मीडिया युझर्सना एक भावनिक आवाहनही केले की, ज्या पालकांनी किंवा आजी-आजोबांनी आपले आयुष्य आपल्यासाठी वेचले, त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जा, सुंदर आठवणी तयार करा आणि त्यांना हे छोटे सुख नक्की द्या. उद्या काय होईल कोणालाच माहीत नाही, पण आजचा दिवस आपण नक्कीच अविस्मरणीय बनवू शकतो.

Grandmother First Flight Goa Trip Viral Video
Viral Video: प्रेमाला वयाचं बंधन नसतं! 81 वर्षांच्या आजीचं 24 वर्षीय तरुणावर जडलं प्रेम; विमानतळावरील Romantic व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरील (Social Media) हजारो युझर्स भावुक झाले आहेत. अनेकांनी आपापल्या आजी-आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला असून काहींनी त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचे म्हटले. एका युझरने लिहिले की, "माझ्या आजीची आठवण आली, आज ती जगात नाही पण हा व्हिडिओ पाहून मन सुखावून गेले." तर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, "मी माझ्या आजीला कमवायला लागल्यावर जग फिरवण्याचे स्वप्न पाहिले होते, पण ती आधीच सोडून गेली. हा व्हिडिओ पाहून माझे मन कुठेतरी सुखावले." इंटरनेटवर या आजीच्या निरागसतेवर आणि नातीच्या या सुंदर प्रयत्नावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com