Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : धारगळमध्ये ट्रक तर मोपा रोडवर क्रेन उलटली; दोन्ही ड्रायव्हर बालंबाल बचावले

Goa Accident : राज्यात अपघातांचे सत्र सुरुच

Ganeshprasad Gogate

Goa Accident : राज्यात अपघातांचे सत्र चालूच असून काल बुधवारी रात्री क्रेन आणि ट्रक उलटण्याच्या घटना घडल्या आहेत. धारगळ येथे वाळू वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची घटना रात्रौच्या सुमारास घडली.

भरधाव ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटला. या अपघातात ड्रायव्हर मात्र बालंबाल बचावला.

तर दुसरा अपघात धारगळ येथील मोपा एलिव्हेटेड रोड पुलावर काम करणारी अवजड क्रेन उलटली याही अपघातात क्रेन ऑपरेटरला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

काल बुधवारी राज्यात अपघातांचे सत्र घडले. बार्शे येथे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात काणकोण येथील एक 55 वर्षीय महिला ठार झाली.

सदर महिला दुचाकीवर मागे बसली होती. तसेच तिस्क उसगाव येथे झालेल्या अन्य एका अपघातात भाजीपालावाहू टेम्पो आणि जीप यांच्यात झालेल्या अपघातात जीपचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली .

तर बुधवारी सकाळच्या सुमारास संजीवनी सहकारी साखर कारखान्याजवळ सदर अपघात झाला.यात जीपच्या दर्शनी भागात्रा चक्काचूर झाला गाडीत अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावे लागले. गोमेकॉ इस्पितळात गंभीर जखमी चालकावर उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT