Goa Cricket  Dainik Gomantak
गोवा

Goa Cricket : क्रिकेट स्‍पर्धेत वर्णव स्ट्रायकर विजेता

Goa Cricket : मालिकावीर ठरलेल्‍या रुपेश शेळके याला रेफ्रिजेटरचे बक्षीस प्राप्‍त झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Cricket : सांगे, येथील शासकीय क्रीडा मैदानावर अखिल गोवा पातळीवर चार दिवस आयोजित केलेल्या धनगर प्रीमियर लीग क्रिकेट स्‍पर्धेचे विजेतेपद वर्णव स्ट्रायकर या संघाने पटकावले. त्‍यांना ६६,६६६ रुपये व आकर्षक चषक देण्‍यात आला.

४४,४४४ रुपयांचे द्वितीय पारितोषिक साईश ब्रदर्स संघाला मिळाले. पारितोषिक वितरण समारंभाला समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, जीसीएचे सचिव रोहन देसाई,

केपेच्या नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर, इतर पंच, समाजाचे नेते उपस्‍थित होते. उपांत्‍य फेरीतील विजेत्या संघाला ११,१११ रुपयांचे बक्षीस देण्‍यात आले. राज्‍यातील मातब्‍बर असे आठ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

मालिकावीर ठरलेल्‍या रुपेश शेळके याला रेफ्रिजेटरचे बक्षीस प्राप्‍त झाले. धनगर लीगचे अध्यक्ष गणपत मोडक, विठोबा खरात, सिद्धेश लांबोर, गुणा दमेकर, राजेश कवळेकर, बोमो लांबोर, विठू बरगडे, बाळा शेळके, नकुल काळे, दिलेश शिंगाडी आदी समाज पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: साखळी नगरपालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प; पालिकेला मिळणार 30 केव्ही वीज

SCROLL FOR NEXT