Dhangar ST Status Demand Dainik Gomantak
गोवा

Dhangar ST Status Demand: 23 वर्षांची प्रतीक्षा, आता धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 'एसटी' दर्जा न मिळाल्यास 4-5 आमदारांना पाडण्याचा दावा

Dhangar Community Government Warning: गवळी-धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा नोव्हेंबरपूर्वी न मिळाल्यास भाजप आणि सरकारविरोधात काम करण्याचा इशारा अखिल गोवा गवळी-धनगर समाजाने दिला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गवळी-धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा नोव्हेंबरपूर्वी न मिळाल्यास भाजप आणि सरकारविरोधात काम करण्याचा इशारा अखिल गोवा गवळी-धनगर समाजाने दिला आहे. समाज आमदार निवडून आणू शकत नसला, तरी विरोधात गेल्यास चार-पाच आमदारांना पराभूत करण्याची ताकद ठेवतो, अशी भूमिका संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी मांडली.

समाजाला ‘एसटी’ दर्जा मिळावा यासाठी गेल्या २३ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारने उपस्थित केलेल्या त्रुटींचे निराकरण करण्यात आले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा झाली आहे. तरीही दर्जाबाबत निर्णय होत नसल्याने समाजात नाराजी असल्याचे कवळेकर यांनी सांगितले. ते संघटनेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विठोबा खरात, वाघो मिसाळ, दिलीप वरक, बाबू जंगले, मणेश लांबोर, धुळू शेळके व इतर तालुक्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, ठोस निर्णय न झाल्यास समाजाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असेही कवळेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ‘गाकुवेध’मधील गावडा, कुणबी व वेळीप या तिन्ही समाजांनी ‘एसटी’ दर्जाच्या मागणीसाठी आमच्यासोबत उभे राहावे, असे भावनिक आवाहन कवळेकर यांनी केले.

न्याय मिळाला नसल्याची खंत

स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर ‘एसटी’ दर्जा देणार असल्याचे सांगत. ज्यावेळी मी विरोधी बाकावर कार्यरत होतो, त्यावेळी सरकार पक्षात नसल्याने दर्जा अडकत असल्याचे बोलले जात होते. नंतरच्या काळात मी दहा आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. सरकारला बळकटी दिली; परंतु अजूनही धनगर समाजाला न्याय मिळाला नसल्याची खंत कवळेकर यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसला 'हात' की वेगळी चूल? निवडणुकीबाबत 'आरजी'च्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक

LPG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री! गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ, दिवाळीपूर्वीच महागाईचा मोठा झटका

खरी कुजबुज: जो जिता वही सिकंदर!

Rohit Sharma: 2027 वर्ल्डकपसाठी 'हिटमॅन'ची खास रणनीती! विजय हजारे ट्रॉफीत मुंबईकडून खेळणार, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुन्हा गाजवणार मैदान

Crime News: फुटबॉल खेळताना मुलांच्या दोन गटांत वाद; अल्पवयीनावर कुत्रा सोडून दांडक्याने मारहाण, आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT