Goa DGP Alok Kumar Dainik Gomantak
गोवा

Goa Police: कायदा हातात घ्याल तर याद राखा; गोवा पोलिस महासंचालकांची क्लब मालकांना तंबी

Goa DGP warning to club owners: क्लबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी क्लबकडून एसओपी तयार करण्यात यावी आणि बाऊन्सर्सना प्रशिक्षण द्यावे, असे कुमार म्हणाले.

Pramod Yadav

पणजी: गोवा पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी राज्यातील क्लब मालकांना चांगलीच तंबी दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतल्यास सक्त कारवाई केली जाईल, असा सूचना वजा इशारा कुमार यांनी दिला आहे. वाराणसी येथील पर्यटकांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर महासंचालकांनी क्लब मालक आणि बाऊन्सर्सना इशारा दिला.

पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी पर्यटन क्षेत्रात कार्यरत असेलल्या सर्वांशी बैठक घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. पर्यटकांसोबत वादविवाद झाल्यास क्लबमधील बाऊन्सर्सनी काय करावे याबाबत नियमावली ठरवून दिली जाईल, असे कुमार यांनी स्पष्ट केले.

“क्लबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी क्लबकडून एसओपी तयार करण्यात यावी आणि बाऊन्सर्सना प्रशिक्षण द्यावे”, असे कुमार म्हणाले.

वागातोर येथे एका नाईट क्लबमध्ये वाराणसीच्या पर्यटकांना मारहाण झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणावरुन पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी राज्यातील क्लबना सूचना दिली आहे.

“क्लबमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटक भेट देत असतात त्यामुळे तेथे बाऊन्सर्सची गरज असते. काहीवेळा त्यांना मध्यस्थी करावी लागते”, असे कुमार म्हणाले.

बाऊन्सर्सना परिस्थिती कशी हाताळावी याची माहिती असावी. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पोलिसांना कल्पना द्यावी. पोलिसांना माहिती न देता कायदा हातात घेतल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आलोक कुमार यांनी दिली.

येत्या काळात राज्यात पर्यटकांची संख्या वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर उत्तर गोवा अधिक्षकांना पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसोबत बैठक घेण्याची सूचना केलीये. पर्यटकांना कशा पद्धतीने हाताळावे याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्याची सूचना करण्यात आली आहे.

ओशनमॅन इव्हेंटबाबत आयपीएस अधिकाऱ्याचा दबाव होता या पर्यटनमंत्र्यांनी केलेल्या आरोपाचे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी खंडन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT