DGP Jaspal Singh  Dainik Gomantak
गोवा

Candolim: गुजरातच्या दुचाकी चालकाला पोलिस महासंचालकांनी पकडले, जाणून घ्या नेमकं काय झालं?

राज्यात अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यातून होणारे मृत्यूचे प्रमाण वाढल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

Pramod Yadav

गोव्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात पोलिसांनी धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात पोलिसांनी नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेकांवर कारवाई करत मोठा दंड वसूल केला. राज्यात अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यातून होणारे मृत्यूचे प्रमाण वाढल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

पोलिस महासंचालक देखील राज्यात वारंवार गस्त घालत अनुचित प्रकरावर लक्ष ठेवत आहेत. पोलिस महासंचालक जसपाल सिंग कांदोळी-नेरूळ येथे गस्तीव होते. यावेळी एक दुचाकी चालक विना हेल्मेट तेही ट्रिपल सीट जात असताना त्यांना आढळला. महासंचालकांनी तात्काळ त्यांना पकडून कळंगुट पोलिसांच्या हवाली केले. कळंगुट पोलिसांनी त्याच्याकडून दंड वसूल केला आहे. केव्हिन पटेल (रा. गुजरातद) असे या दुचाकी चालकाचे नाव आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील पोलिस महासंचालकांनी विना हेल्मेट आणि ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई केली होती. 26 डिसेंबर रोजी पर्रा येथे एक दुचाकी चालक विना हेल्मेट आणि ट्रिपल सीट जात असताना पोलिस महासंचालक जसपाल सिंग (Goa DGP Jaspal Singh) यांच्या निर्देशनास आले पोलिस महासंचालकांनी या दुचाकी चालकाला पकडले. रवी चालक असे या वाहन चालकाचे नाव असून, म्हापसा पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT