नाताळ आणि नवीन वर्षाचे (X’mas & New Year) स्वागत करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. राज्यातील वाहतूक व्यवस्था, कायदा व प्रशासन व्यवस्थित रहावे यासाठी गोवा पोलिस (Goa Police) सतर्क झाले आहेत. विशेषत: राज्यातील वाढलेल्या अपघातांची संख्या लक्षात घेता, पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन (Traffic Violation) करणाऱ्यांविरोधात गोवा पोलिस कारवाई करत दंड वसूल केला जात आहे.
बाईक रायडरला थेट पोलिस महासंचालकांनीच पकडले
वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई सक्त केली आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या कोणालाच सूट दिली जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. याचा परिचय आज पोलिस महासंचालकांनी घडवून दिला.
झाले असे की, पर्रा येथे एक दुचाकी चालक विना हेल्मेट आणि ट्रिपल सीट जात असताना पोलिस महासंचालक जसपाल सिंग (Goa DGP Jaspal Singh) यांच्या निर्देशनास आले पोलिस महासंचालकांनी या दुचाकी चालकाला पकडले. रवी चालक असे या वाहन चालकाचे नाव असून, म्हापसा पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
दरम्यान, दक्षिण गोव्यात वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी संयुक्तविद्यामाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली. दोन दिवस केलेल्या या कारवाईत एकूण 345 वाहन चालकांविरोधात कारवाई केली. या कारवाईतून दोन लाख 68 हजार 500 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढे देखील ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.