Railway  Dainik Gomantak
गोवा

Maha Kumbh Mela 2025: महाकुंभला तेराशे भाविक जाणार! मडगावहून सुटणार गाडी; करमळी अन् थिवी स्थानकावरही थांबा; मंत्री फळदेसाईंची माहिती

Goa Devdarshan Yatra: ज्या भाविकांची यात्रा निश्‍चित झाली आहे त्यांना कळवले आहे. त्यांनी रेल्वे स्थानकावर किमान १ तास अगोदर यावे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील नागरिकांना सुलभतेने महाकुंभाला प्रयागराज येथे जाता यावे, पावन पवित्र स्नानाची डुबकी मारता यावी या उद्देशाने मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजनेअतंर्गत दुसरी रेल्वे आज (13 फेब्रुवारी) दुपारी ४.४० वा. मडगाव रेल्वेस्थानकावरून रवाना होणार असून सुमारे १३०० भाविक उद्या प्रवास करणार असल्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई (Subhash Phaldesai) यांनी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी संचालक अजित पंचवाडकर उपस्थित होते. दरम्यान फळदेसाई म्हणाले, यात्रेकरूना सुलभरित्या प्रवास करता यावा यासाठी करमळी आणि थिवी स्थानकावरही रेल्वे थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या यात्रे दरम्यान प्रवास करताना ट्रेन ट्रॅक ब्लॉक असल्यास रेल्वे प्रवासाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. त्यासोबत येतानाही काहीवेळा उशिरा रेल्वे पोहचू शकते. येताना जेवणाची कमतरता होऊ शकते. तसेच महाकुंभच्या ठिकाणी पोहोचल्यावर स्वतःची काळजी स्वतःला घ्यावी लागेल, असे फळदेसाई यांनी सांगितले.

ज्या भाविकांची यात्रा निश्‍चित झाली आहे त्यांना कळवले आहे. त्यांनी रेल्वे स्थानकावर किमान १ तास अगोदर यावे. जरी रेल्वे ‘महाकुंभ’च्या स्थानापासून ४ किमी अंतरावर थांबत असली तरी गर्दी आणि इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणात चालावे लागते. त्यामुळे आरोग्य (Health) चांगले आहे अशा १८ ते ६० वर्षातील नागरिकांनीच शक्यतो प्रवास करावा,असे फळदेसाई यांनी सांगितले.

आणखी रेल्वे मिळवण्याचे प्रयत्न

या महाकुंभला जाण्यासाठी अनेक भाविक उत्सुक आहेत. त्यासाठी अजून रेल्वे पाठविण्यासाठी सरकार प्रयत्नरत असून रेल्वे मिळविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. अजूनही ३ हजार अर्ज प्रलंबित आहेत.परंतु ज्या नागरिकांची यात्रा निश्‍चित झाल्याचे कळविण्यात आले आहे त्यांनीच यावे इतरांनी येऊन रेल्वेस्थानकावर उगाच गर्दी करू नये, असे आवाहन फळदेसाई यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT