Drug Network in Goa  Gomantak Digital Team
गोवा

Goa News : राज्यातील ड्रग्स नेटवर्क उद्ध्वस्त करा

काँग्रेस : गुन्हेगारीसंदर्भात महासंचालकांना देणार निवेदन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ आहे. मात्र, मागील दहा वर्षांत गोव्यात ड्रग्सचा सुळसुळाट, फोफावलेला वेश्या व्यवसाय, खंडणी यासारख्या प्रकारांमुळे गोव्याची बदनामी होत आहे. सरकारने केवळ ड्रग्सचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा मूळ ड्रग्सचे नेटवर्क उद्ध्वस्त करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

तसेच राज्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळातर्फे पोलिस महासंचालकांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. यासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके म्हणाले की, अलीकडे पर्यटक हे गोव्यात ड्रग्सचे सेवन करण्यासाठी येऊ लागलेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात, गावागावांत ड्रग्स पोहचले आहे. किनारी भागात अक्षरशः ड्रग्सच्या माफियांनी उच्छाद मांडला आहे. विशेष म्हणजे, कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून ड्रग्सचा व्यवहार चालतोय.

कायदा-सुव्यवस्था ढेपाळली

मध्यंतरी, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी ड्रग्स व्यवहाराशी निगडित नावे व इतर माहिती आपल्याकडे आहे, असे सांगितले होते. अशावेळी पोलिसांनी लोबोंची चौकशी करून त्यांच्याकडून माहिती गोळा करावी. सध्या गोव्यातील वाढते गुन्हे, ड्रग्स बनविणारी रासायनिक प्रयोगशाळा सापडणे, ही चिंतेची बाब आहे. तसेच बिनदिक्कतपणे चालणाऱ्या ड्रग्स व्यवहारामुळे येथील कायदा-सुव्यवस्थाही ढेपाळली आहे, हेच अधोरेखित होते, असा आरोप भिके यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT