उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर (Babu Kavalekar) यांनी केपेत ‘घर चलो अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत मतदार संघातील प्रत्येक घरात जाऊन जनसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण येणाऱ्या काळात करणे हा उद्देश असल्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी यावेळी सांगितले. बार्शे गावात ग्रामदैवत सिद्धेश्वर महादेव मंदिरात देवाला श्रीफल आणि फुले अर्पण करून या मोहिमेचा रीतसर शुभारंभ उपमुख्यमंत्री कवळेकरांनी केला. यावेळी त्यांच्या सोबत दक्षिण गोवा जिल्हा पंचयातीचे उपाध्यक्ष खुशाली वेळीप, बार्शेचे सरपंच अर्जुन वेळीप (Arjun Velip), भाजप केपे मंडळाचे अध्यक्ष संजय वेळीप, उपसरपंच लक्ष्मण गांवकर, पंच सदस्य व माजी सरपंच प्रजिता वेळीप, माजी पंच सरपंच व मोठ्या जन समुदाय यावेळी उपस्थित होता.
या आपल्या मोहिमे बद्दल बोलताना उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले की, उपमुख्यमंत्री झाल्यापासून केपेत नियमित पणे दर मंगळवार आणि गुरुवारी लोकांच्या समस्या सर्व खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ऐकत होतो. तसेच महिन्या दोन महिन्यातून या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन गेली २ वर्षे प्रशासन तुमच्या द्वारी राबवत आलो आहे. गेले महिनाभर हे घर चलो अभियान राबविणीसाठी आम्ही नियोजन करत होतो. 10 दिवसांच्या गणपती नंतर 25 सप्टेंबर पासून या मोहिमेचा शुभारंभ होणार होता, पण पितृपक्षामुळे आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभारंभ केला असे उपमुख्यमंत्री कवळेकर यावेळी म्हणाले. घरोघर फिरत असताना लोक आपल्या समस्या सांगतात तसेच काही वयस्कर मंडळी त्यांच्या मनातल्या काही सूचना मला करतात ते ऐकून बरे वाटते असे उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले. बार्शे गाव भरपूर मोठा गाव आहे. एक प्रकारे या अभियाना मार्फत उपमुख्यमंत्र्यांनी आपले शक्ति प्रदर्शनच केले. अख्खा गाव यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या या मोहिमेत सहभागी झाला असल्याचे जाणवले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.