COVID-19 Cases Dainik Gomantak
गोवा

COVID-19 Cases: राज्यात कोरोनाच्‍या एकाही रुग्णाची नोंद नाही, आरोग्य संचालनालयाकडून स्पष्टता; सतर्कता व सावधगिरीचे आवाहन

Goa Corona Cases Update: केंद्र सरकारने कोरोना रुग्‍णांसंदर्भात जारी केलेल्‍या देशव्‍यापी आकडेवारीत गोव्‍यात १० रुग्‍ण असल्‍याचे म्‍हटले होते, परंतु त्‍यासंदर्भात राज्‍य सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळाला नव्‍हता.

Sameer Amunekar

पणजी: केंद्र सरकारने कोरोना रुग्‍णांसंदर्भात जारी केलेल्‍या देशव्‍यापी आकडेवारीत गोव्‍यात १० रुग्‍ण असल्‍याचे म्‍हटले होते, परंतु त्‍यासंदर्भात राज्‍य सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळाला नव्‍हता. दरम्यान, आरोग्‍य खात्‍याने खुलासा करत राज्‍यात सद्यस्‍थितीत कोरोनाचा एकही रुग्‍ण नसल्‍याचे स्पष्ट केले आहे.

आरोग्य संचालनालयाच्या संचालिका डॉ. रुपा नाईक यांनी म्‍हटले आहे, की देशभर काही भागांत कोरोना रुग्ण वाढले असले, तरी गोवा राज्यात अद्याप एकही रुग्णाची नोंद झालेली नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

आरोग्य यंत्रणांकडून सतत निगराणी आणि तपासणी केली जात आहे. गरज पडल्यास योग्य त्या उपाययोजना तत्काळ राबवण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. कोरोना प्रकरणांमध्ये घट झाली असली, तरी सावधगिरी व सतर्कता महत्त्वाची असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, गोमेकॉत मास्क घालून आत प्रवेश करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, तसे अधिकृत आदेश जारी झालेले नाहीत.

राज्यात कोरोनाचे कोणतेही सक्रिय प्रकरण सध्या अस्तित्वात नाही. गोमेकॉमध्ये सध्या एकही रुग्ण दाखल नाही आणि कोणावरही उपचार सुरू नाहीत, असे डॉ. पाटील यांनी ठामपणे सांगितले.

खोकल्याची लक्षणे असल्यास तपासणी करा

राज्यात पावसाळ्याला प्रारंभ झाल्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी.

स्वच्छता राखावी आणि सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे असल्यास लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य संचालनालयाच्या संचालिका डॉ. रुपा नाईक यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT