Goa: राज्यात 1.15 लाख लिटर दूध उत्पादन, उत्पादक संघात 19,100 शेतकऱ्यांची नोंद

Goa Dairy Industry: गोव्याला दिवसाला अंदाजे ४ लाख लिटर दुधाची आवश्यकता असते, त्याप्रमाणे अंदाजे ३ लाख लिटर दुधाची व्यवस्था इतर माध्यमातून करावी लागते.
Goa Dairy
Goa DairyDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: दुग्ध व्यवसायात गोव्याने चांगली प्रगती साधली असून १९८४ साली स्थापन झालेल्या गोवा राज्य सहकारी दूध उत्पादक संघाचे अजूनपर्यंत १९१०० शेतकऱ्यांची नोंद असून १८१ दूध सहकारी सोसायट्या असून दररोज ६५००० लिटर व इतर माध्यमातून जवळ जवळ ५० हजार लिटर दुधाचे उत्पादन होत असते. गोव्यात एकूण अंदाजे १.१५ लाख लिटर दूध उत्पादन होत असते.

गोव्याला दिवसाला अंदाजे ४ लाख लिटर दुधाची आवश्यकता असते, त्याप्रमाणे अंदाजे ३ लाख लिटर दुधाची व्यवस्था इतर माध्यमातून करावी लागते. गोव्यात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतून दुधाचा पुरवठा होत असतो, अशी माहिती गोव्याच्या पशुपालन व पशू वैद्य सेवा संचालनालयाकडून मिळत आहे.

Goa Dairy
Goa Politics: गोवा मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्‍यता, दिल्लीत पार पडली बैठक; CM सावंतांना वगळता सर्व मंत्र्यांचे घेणार राजीनामे

गोव्यात दुधाचा पुरवठा करण्यासाठी ४४० दूध बूथ व ८५० पुरवठा एजन्सी काम करीत आहेत. ही आकडेवारी काळानुरूप बदलत असते. गोव्यात ज्या इतर कंपन्यांकडून दूध पुरवठा होत असतो, त्यात सुमुल, गोवा डेअरी, नंदिनी यांचा समावेश आहे. शिवाय वारणा, अमूल, आरोग्य व या सारख्या इतर कंपन्याकडूनही बारीक मोठ्या प्रमाणात दूध पुरवठा होत असतो.

गोव्यात दुग्ध व्यवसाय क्षेत्रात वाढ व्हावी या साठी सरकारतर्फे अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पशुपालन व पशू व वैद्य सेवा संचालनालयाकडून मिळते. गोवा डेअरीतर्फे केवळ दूध पुरवठाच नव्हे, तर दुधापासून तयार होणारे तूप, बटर, लस्सी, ताक, दही, फ्लेवर्ड दूध उत्पादन केले जाते, असे नगर्सेकर यांचे मत आहे.

Goa Dairy
Goa News: शिरोडा येथील पत्नीच्या खून प्रकरणी फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या पती चेतन गावकर याला एलडीसी पदावरून केले निलंबित

मोठ्या गुंतवणुकीची आवश्‍यकता नाही

गुजरातमधील सुमुल ही दुग्ध व्यवसायातील एक प्रमुख संस्था आहे. या संस्थेतर्फे गोव्यात नियमित एक लाख लिटर दुधाचा पुरवठा होत असतो. या संस्थेचा गोव्यातील व्यवसाय २०१३ पासून सुरू झाला.

सुमुल कंपनीचे गोव्यातील अधिकारी उत्कल दवे यांच्या सांगण्यानुसार गोव्यातील ५०० ते ५५० शेतकऱ्यांकडे संपर्कात आहे. दुग्ध व्यवसायात शाश्वत, स्वदेशी उपजिविका उपलब्ध असून त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता भासत नाही, असे दवे सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com