वास्को पाठोपाठ आता फोंडा तालुक्यातही डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य खात्यासाठी ही बाब डोकेदुखी ठरली आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa: राज्यात डेंग्यूचा धोका वाढला!

जुलैमध्ये राज्यात १०२ संशयित रुग्ण आढळले. त्या परिसरात आरोग्य खात्यातर्फे योग्य ती उपाययोजना हाती घेण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा: गेले दीड वर्ष कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर आता राज्यात (In the state) डेंग्यूने डोके वर काढले (Dengue) आहे. वास्को पाठोपाठ आता फोंडा तालुक्यातही डेंग्यूचे रुग्ण वाढत (Following Vasco, dengue patients are also increasing in Fonda taluka) असल्याने आरोग्य खात्यासाठी ही बाब डोकेदुखी ठरली (health department) आहे. राज्यात जुलै महिन्यात एकूण १०२ डेंग्यूचे संशयित रुग्ण सापडले. त्यात दक्षिण गोव्यात ६५, तर उत्तर गोव्यातील ३७ रुग्णांचा समावेश आहे.

फोंडा तालुक्यात आतापर्यंत एकूण २३ डेंग्यू रुग्ण सापडले असून त्यात सर्वाधिक फोंडा आरोग्य खात्याच्या अंतर्गत १२, शिरोड्यात ५ तसेच मडकई, बेतकी - खांडोळा व धारबांदोड्यात प्रत्येकी दोन असे एकूण २३ डेंग्यूचे सक्रिय रुग्ण फोंडा तालुक्यात आढळून आले आहेत, तर डिचोलीत सात रुग्ण आढळले आहेत.

पंधरवड्याभरापूर्वी फोंडा तालुक्यातील डेंग्यू रुग्‍णांचा आकडा ११ वर होता, पण आता हा आकडा २३ वर पोचल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. डेंग्यू झालेले सर्व रुग्ण सुरक्षित असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. फक्त शिरोड्यातील एक डेंगू संशयित ज्याला अन्य आजार होते तसेच दारुपानामुळे आरोग्य बिघडल्याने एकाचे निधन झाले होते. मात्र, हा रुग्ण डेंग्यूमुळे वारला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

फोंडा - कुर्टी भागात सर्वाधिक डेंग्यू रुग्ण आहेत. फोंड्यानंतर शिरोड्याचा क्रमांक असून अन्य ठिकाणी सुदैवाने कमी रुग्ण आहेत. धारबांदोडा प्राथमिक आरोग्य केंद्र हे फोंडा तालुक्याशीही संबंधित आहे. फोंडा व धारबांदोडा आदी भागात डेंग्यूचा तेवढा प्रसार झालेला नाही. फोंडा तसेच धारबांदोडा भागातील आरोग्य केंद्रातील स्वच्छता निरीक्षकांनी डेंग्यू रुग्ण सापडल्यानंतर सगळीकडे स्वच्छता मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

जुलैमध्ये राज्यात १०२ संशयित रुग्ण आढळले. त्या परिसरात आरोग्य खात्यातर्फे योग्यती उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. जुलै महिन्यात दक्षिण गोव्यातील वास्कोत ४१, कुठ्ठाळीत २४ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले, तर उत्तर गोव्यात कोलवाळ येथे ९ संशयित रुग्ण सापडले आहेत.

- डॉ. कल्पना महात्मे, मुख्य वैद्यकीय अधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT