Goa Delhi Flight
पणजी: विमानातील तांत्रिक अडचणीमुळे गोवा दिल्ली विमानाचे उड्डाण प्रवासी विमानात बसल्यानंतर रद्द करण्यात आले. या विमानात बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्यासह त्यांची टीम आणि इतर प्रवासी होते. फ्लाईट्च्या उड्डाणाला विलंब झाल्याने प्रवाशांना विमानावर ताटकळत थांबावे लागले. अखेर राज्यपाल आर्लेकरांनी दुसऱ्या विमानाने दिल्ली गाठली.
झाले असे की, गोव्यातून दिल्ली जाणारी इंडिगोची फ्लाईट 6E 6193 उड्डाणासाठी सज्ज झाली होती. विमानात बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, त्यांची टीम आणि इतर प्रवासी बसले होते. विमान रनवेवर आणले जात असताना एअर ट्रॅफिकचे कारण देत फ्लाईट रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. विमानातून सर्व प्रवासी उतरवण्यात आले. दरम्यान, कालांतराने विमानाच्या पुढच्या भागातील गिअरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती कंपनीने दिली.
विमानातून प्रवासी उतरवल्यानंतर प्रवाशांना पाणी, खाद्यअन्न यांची सोय केली नाही, अशी तक्रार प्रवाशांनी केली. कंपनीने फ्लाईट रद्द केल्याची माहिती उशीरा दिली त्यामुळे ना रिफंड घेता आले ना दुसऱ्या फ्लाईटचे नियोजन करता आले. त्यामुळे जास्त विलंब झाला, अशी प्रवाशांनी तक्रार केली.
दरम्यान, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आणि त्यांच्या टीमने एअर इंडियाच्या फ्लाईटने दिल्ली गाठली. दुसऱ्या एका प्रवाशांनी चेन्नई आणि तेथून दिल्ली असा प्रवास केला. तर काही प्रवाशांनी मुंबईतून दिल्लीला प्रवास केला.
कंपनीचा खुलासा
गोव्यातून दिल्लीला जाणारी फ्लाईट 6E 6193 तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आली. फ्लाईट रद्द करण्यात आल्यानंतर सर्व प्रवाशांना रिफंड किंवा दुसरी फ्लाईट बुक करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला. प्रवाशांना झालेल्या त्रासाबाबत इंडिगो दिलगीर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.