Viral Post On Goa Tourism And Government Dainik Gomantak
गोवा

Viral Post: गोव्याच्या दुरवस्थेला कोण जबाबदार? Reddit पोस्टवर लोकांनी व्यक्त केलेली मतं वाचा

Viral Post On Goa Tourism And Government: पायाभूत सुविधांचा आभाव असल्याने गर्दी वाढणे, लॉजिंग महाग होणे, प्रवास आणि खाद्यपदार्थांचे भाव वाढतात, असे मत लोकांनी व्यक्त केलं आहे.

Pramod Yadav

पणजी: रस्त्यांची दुरावस्था, विस्कळीत वाहतूक, वाढलेले हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांचे दर तसेच पर्यटनाचा ढासळलेला दर्जा! यावरुन सध्या गोव्याच्या पर्यटनावर टीका करणाऱ्यांची संख्या वाढलीय. राज्य सरकार बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असले तरी सोशल मिडियावर खुल्या चर्चांना रोखणे त्यांना शक्य होत नाहीए. अशीच आणखी एक चर्चा सध्या रेडीट या सोशल प्लॅटफॉर्मवरती होतेय. यात गोव्याच्या दुरावस्थेला कोण जबाबदार आहे यावर लोक मतं व्यक्त करत आहेत.

गोव्याच्या वैभवाला धक्का लावण्यास मोदी सरकार जबाबदार आहे का? असा प्रश्न एका रेडीट युझरने उपस्थित केला. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी विविध मतं व्यक्त केली आहेत.

Reddit Post Screenshot

या पोस्टवर मूळ गोव्यातील असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या मित्रांना गोव्यात घेऊन यायची माझी अजिबात इच्छा नाही. सार्वजनिक वाहतुकीचा कचरा झालाय आणि प्रवास खूप महाग देखील झालाय. युरोपही आता स्वस्त वाटू लागलाय. ईशान्य भारत देखील खूप चांगला आहे. पण, या गोव्यातील नियमित समस्या आहेत आणि याचा पीएम मोदी किंवा केंद्रातील सरकारशी काही संबंध नाही", असे मत या युझरने व्यक्त केले आहे.

Reddit Post Screenshot

"स्थानिक पर्यटक ठिकाणांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची वाढली आहे, हे लोक त्याच त्या प्रसिद्ध १० ठिकाणांना भेट देतात. पायाभूत सुविधांचा आभाव असल्याने गर्दी वाढणे, लॉजिंग महाग होणे, प्रवास आणि खाद्यपदार्थांचे भाव वाढतात. आणि ही समस्या उटी, केरळ आणि गोव्यात येते. यात केंद्र सरकारचा दोष आहेच पण यात राज्याला अधिक जबाबदार धरायला हवं", असं एका युझरने म्हटले आहे.

Reddit Post Screenshot

"गोवा अगोदरच उद्धवस्त झालांय. गोव्यातील हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या किमती चेक करा. गोव्यात कचरा, फसवणूक करणारे घोटाळेबाज, आणि बीचवर पाहायला मिळणारी बेशिस्त गर्दी. मी २०२२ मध्ये गोव्यातील कळंगुट बीचला भेट दिली होती. येथे भ्रष्टाचार बोकाळला आहे", असे आणखी एक युझरने म्हटलंय.

Reddit Post Screenshot

"गोव्यात राज्य सरकारच सर्व गोष्टींसाठी जबाबदार आहे. राज्याचे पोलिस, पर्यटन व्यवस्थापन आणि हद्दीत कार्यरत असलेल्या व्यवसायांचे नियंत्रण राज्य सरकारच्या हातात आहे. व्यवस्था कोसळण्याचा दोष येथील राज्य सरकारला देता येईल", असे एका युझरने म्हटले आहे.

Reddit Post Screenshot

मुख्य समस्या ही आहे की उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक त्यांची संस्कृती घेऊन गोव्यात येतायेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्थिती फारच खराब झालीय. परदेशी पर्यटकांना कदाचित याचा अंदाज आला असवा त्यामुळे त्यांनी सुरक्षित बाली किंवा व्हिएतनाम सारख्या ठिकाणांना पसंती देत असावेत. पैशांपेक्षा सुरक्षा हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे, असे मत एका युझरने व्यक्त केले आहे.

त्यावर स्थानिक पर्यटक गोव्याचा प्रतिमा खराब करतायेत अशी प्रतिक्रिया दुसऱ्या युझरने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT