
सासष्टी: गोव्यात ओला, उबेर सारखी कॅब सुविधा नसल्याने राज्यात येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय होते. राज्य सरकार स्वत:ची कॅब सुविधा निर्माण करण्यासाठी सकारात्मक आहे पण, स्थानिक टॅक्सी चालक याला विरोध करतायेत. पण, राज्यात कॅब सुविधा कधी येणार, सरकार यासाठी काय प्रयत्न करत आहे? याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका मुलाखतीत भूमिका मांडली.
'पांचजन्य'च्या सागर मंथन संवादात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री सावंत बोलत होते.
गोवा देशाची पर्यटन राजधानी आहे. गेल्या 25-30 वर्षांत येथील पर्यटन दिवसेंदिवस वाढले आहे. कोरोनानंतर देशात प्रथम गोव्यात पर्यटन खुले करण्यात आले. गोव्याची श्रीलंका, मालदीव यासारख्या देशांची स्पर्धा आहे, यात शंका नाही. सर्व देश आपापल्या देशात पर्यटनाला चालना देत आहेत. पण गोव्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात वाहतुकीचा प्रश्न आहे पण, सरकार त्यावर लवकरच तोडगा काढेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटलीय का? या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
गोव्यात APP आधारित टॅक्सीसेवा नाही यामुळे पर्यटकांना मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो तसेच गैरसोय होते. याबाबत बोलताना राज्यात गोवा माईल्स मोबाईल APP सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले. टॅक्सी चालकांना मोबाईल एका APP वर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्यात मेट्रो नाही पण, वाहतूक सुरळीत होण्यासाठी रेल्वेसोबत देखील बोलणी सुरु असल्याचे सावंत यांनी सांगितले. दरम्यान, काही प्रमाणात पर्यटकांची गैरसोय देखील होते हे मुख्यमंत्री सावंत यांनी मान्य केले.
गोव्यात गेल्या १० वर्षात मागच्या ५० वर्षात झाली नाहीत एवढी विकासकामे झाली आहेत. विकासाच्या बाबतीत गोवा देशात चौथ्या क्रमांकावर आहे. राज्यात हर घर जल, ग्राम सडक योजना, वीज पुरवठा असा पायाभूत सुविधांमध्ये राज्याने महत्वपूर्ण प्रगती केलीय. गोवा लहान राज्य आहेत. राज्यात ९१ ग्रामपंचायत आणि ४१ पालिका आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी प्रशासनाला सहज यांच्यापर्यंत पोहोचता येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०४७ पर्यंत भारत विकसित देश करण्याचा संकल्प केला आहे. त्याप्रमाणे गोवा देखील विकसित राज्य होईल, पण १० वर्ष आधीच म्हणजेच २०३७ रोजी गोवा पूर्णपणे विकसित झालेले राज्य असेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. इतर मोठ्या राज्यांच्या तुलनेत आम्ही ८० टक्के विकास साध्य केला आहे. तसेच, गोवा जीडीपीसह विविध बाबींमध्ये इतर राज्यांच्या पुढे आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.