Goa School Closed Dainik Gomantak
गोवा

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Goa Schools Closed Due To Heavy Rain: राज्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून दरड कोसळणे, रस्ते पाण्याखाली येऊन संपर्क तुटणे आदी प्रकार सुरू आहेत. बहुतांश नद्यांनी पातळी ओलांडली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गेल्या चोवीस तासांत पावसाने राज्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. ही अतिवृष्टी असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले असून, पावसाचा जोर उद्याही असाच राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही स्थिती लक्षात घेऊन शुक्रवार, ४ रोजी राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसा आदेश शिक्षण खात्याने जारी केला आहे.

अधिक पाऊस असल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असे पाऊल उचलले जाते. उद्या पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा बंद राहतील. राज्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून दरड कोसळणे, रस्ते पाण्याखाली येऊन संपर्क तुटणे आदी प्रकार सुरू आहेत. बहुतांश नद्यांनी पातळी ओलांडली आहे. साखळी येथे पंपिंगद्वारे पाणी कमी करण्यात आले.

झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात घर आणि वीज वाहनांचे नुकसान होणे आदी प्रकार मोठ्या प्रमाणात घडले. शुक्रवारी देखील पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज आहे. गोवा वेधशाळेने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, पावसात शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोठे काय घडले?

१) कुशावती नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने मडगाव-केपे रस्त्यावर कंबरभर पाणी येऊन पूर्णपणे वाहतुकीसाठी रस्ता बंद झाला होता.

२) भटवाडी, हरमल येथील मुख्य रस्त्यालगत सुरक्षाभित उभारल्याने रस्त्यावरील पाणी जाण्याचा मार्गच पाणी साचून रस्ता पाण्याखाली.

३) मुसळधार पावसामुळे तिलारी धरण ओव्हरफ्लो. इतर धरणांतही पातळी वाढली

४) मानसवाडा, चिंबल येथे मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या पावसामुळे घराची संरक्षणभिंत कोसळल्याने घराला धोका निर्माण झाला आहे.

५) सावरी, नेत्रावळी येथे कोसळली दरड; अनेक भागांत अग्निशमन दलाचे अधिकारी मदतकार्यात व्यस्त.

६) म्हार्दोळ येथे घरावर दोन झाडे कोसळून नुकसान, दोन ६ वाहनांचेही नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Railway Project: 'गोवा कोल हब बनणार नाही...'; रेल्वे दुहेरीकरणावरुन मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही, पण वाद कायम

High Court: गोवा सरकारला मोठा झटका; वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील Sports Quota रद्द

Sara Tendulkar Goa Vacation: सारा तेंडुलकरचे गोवा व्हेकेशनचे फोटो व्हायरल! मिस्ट्री मॅनसोबतच्या जवळीकतेने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कोण आहे तो?

Goa News: गोव्यात सरकारी कर्मचारी अजूनही Holiday च्या मूडमध्ये; जनतेची कामे ठप्प

Viral Video: 'पूर नव्हे, अल्लाहचा आशीर्वाद'! पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा पूरग्रस्तांना अजब सल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT