Dayanand Social Security Scheme Fraud Dainik Gomantak
गोवा

Dayanand Social Security Scheme: दयानंद योजनेत पुन्हा गोंधळ! राज्यात 13 हजार बोगस लाभार्थी, 50 कोटी सरकारी तिजोरीत जमा

Dayanand Social Security Scheme Fraud: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून दयानंद सामाजिक सुरक्षा योजना राबवण्यात येते. मात्र या योजनेतील घोळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

Manish Jadhav

पणजी: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून दयानंद सामाजिक सुरक्षा योजना राबवण्यात येते. मात्र या योजनेतील घोळ पुन्हा एकदा समोर आला आहे. समाज कल्याण खात्याकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल 13 हजार बोगस लाभार्थी सापडले असून त्यांच्याकडून 50 कोटी वसूल करण्यात आले आहेत. यापूर्वी, या योजनेच्या 14 हजार अपात्र लाभार्थ्यांची नावे समाज कल्याण संचालनालयाने वगळली होती. यात पूर्णपणे व्यवसाय करणाऱ्या 2000 लाभार्थ्यांचा समावेश होता. त्यांच्याकडून 39 कोटी रुपये वसूल करण्यात आले होते.

13 हजार बोगस लाभार्थी

दरम्यान, समाज कल्याण खात्याकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल 13 हजार बोगस लाभार्थी सापडले आहेत. त्यांच्याकडून 50 कोटी वसूल करण्यात आले आहेत. बोगस लाभार्थ्यांमध्ये मृत्यू झालेले, परप्रांतीय आणि या योजनेसाठी पात्र नसलेल्यांचाही समावेश आहे. एवढ्या मोठ्या सर्वेक्षणात नजर चुकीने आणि इतर कारणांमुळे काही जिवंत असलेले पात्र लाभार्थी जिवंत नसल्याचे खात्याकडून बॅंकांना (Bank) पाठवलेले पत्र मागे घेऊन अशांचे न मिळालेले पैसे देऊन त्यांची योजना सुरु ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकरांनी दिली.

कुणासाठी ही योजना राबवण्यात येते?

समाजकल्याण खात्याच्या वतीने दयानंद सामाजिक सुरक्षा योजना राबवण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विधवा महिलांना (Women) मदतनिधी दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या योजनेंतर्गत महिन्याकाठी 2 हजार रुपये दिले जातात. यातील लाभार्थ्यांसाठी सुरुवातीला राज्य सरकारने वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 25 हजार रुपये ठेवली होती, परंतु आता ती वाढवून दीड लाख रुपये करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

6.30 कोटींची फसवणूक; संशयित दोडामार्गात जेरबंद, बंगळुरू पोलिसांच्या तावडीतून झालेला फरार; इको-फार्ममधून ताब्यात

Viral Video Controversy: पर्यटकाच्या इन्स्टाग्राम रीलमुळे वाद, टॅक्सी चालकांची एन्फ्लुएन्सरविरोधात पोलिसांत तक्रार

Cashew Festival 2026: गोवा काजू महोत्सवाची पर्वणी, पणजीत आयोजन; गोव्याच्या कृषी वारशाचा दिमाखदार उत्सव

Goa Crime: टँकर चालकावर जुन्या मालकाकडून खुनी हल्ला! पणजीतील प्रकार; संशयित समीर खानला अटक

छत्तीसगडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! दोन कारची समोरासमोर धडक; एका लहान मुलासह 6 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT