Alambi Daink Gomantak
गोवा

Goa: डिचोलीत मोसमापूर्वीच नैसर्गिक अळंब्यांचे दर्शन..!

निसर्ग नियमानुसार दरवर्षी साधारण आषाढी एकादशीच्या काळात अळंबी उगवण्याचे दिवस असतात.

दैनिक गोमन्तक

डिचोली: निसर्गाच्या नियमाप्रमाणे पावसाळ्यात रानावनात वारूळावर उगवणारी 'अळंबी' (Alambi) म्हटली, की प्रत्येकाच्या जिभेला पाणी सुटते. रुचकर असलेल्या या अळंब्यांचा एकदा तरी आस्वाद घ्यायला मिळावा, यासाठी खवय्याचा आटापिटा असतो. निसर्ग नियमानुसार दरवर्षी साधारण आषाढी एकादशीच्या काळात अळंबी उगवण्याचे दिवस असतात.

यंदा मात्र आषाढी एकादशीला जवळपास अठरा दिवस असतानाच, डिचोलीत अळंब्यांचे दर्शन झाले आहे. शुक्रवारी (ता. 2) डिचोली-साखळी रस्त्यावरील कुळण-कारापूर परिसरात 'अळंबी' विक्रीस उपलब्ध झाली होती. मागील वर्षी संततधार पावसामुळे अळंब्यांच्या पिकावर परिणाम झाला होता. मागील वर्षी जुलै महिन्याचा पंधरवडा उलटल्यानंतर अळंब्यांचे बाजारात दर्शन झाले होते. यंदा मात्र जुलै (July) महिन्याच्या सुरवातीस अळंबी उगवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. आठवड्यापूर्वी पडलेला जोरदार पाऊस आणि मागील दोन दिवस पडलेले ऊन यामुळे पोषक वातावरण तयार होऊन अळंबी उगवलेली आहेत. असा जाणकारांनी अंदाज वर्तविला आहे.

महाग असूनही तेजी

शुक्रवारी कुळण आणि कारापूर-तिस्क परिसरात मिळून दोन महिला अळंब्यांची विक्री करताना दिसून आले. अळंबी म्हटल्याबरोबर रस्त्यावरून ये-जा करणारे वाहने थांबवून अळंबी खरेदी करण्यासाठी गर्दी करीत होते. महाग असतानाही अळंब्यांना तेजी आली होती. सुरवातीस 500 रुपये दराने वाटा या दराने विक्री चालू होती. मागणी वाढल्याने नंतर हाच भाव 600 रुपये झाला. आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येक वाट्यात जेमतेम 35 ते 40 अळंबी होती आणि तिही लहान आकाराची.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT