Goa: डिचोलीच्या अपक्ष नगरसेवकांचा भाजपप्रवेश

डिचोलीचे (Dicholi) अपक्ष नगरसेवक निलेश कुबळे (Nilesh Kubale) यांनी त्यांच्या समर्थकांसह आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला.
BJP
BJPDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: डिचोलीचे (Dicholi) अपक्ष नगरसेवक निलेश कुबळे (Nilesh Kubale) यांनी त्यांच्या समर्थकांसह आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. डिचोली नगर पालिकेवर आधीपासूनच भाजपची सत्ता असतांना आता आणखी एक नगरसेवक त्यांच्या गोटात दाखल झाल्याने भाजपला खंबीर पाठबळ मिळाल्याचे यादरम्यान प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे (Sadanand Tanwade) यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत डिचोली मतदार संघात (Dicholi constituency) इच्छुकांची संख्या अधिक असली तरी पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, असे तानवडे म्हणाले. तर नव्याने पक्षात प्रवेश केलेले नगरसेवक निलेश कुबळे म्हणाले, ‘ आमच्या मतदार संघात आमचे आमदार चांगले काम करीत आहेत. त्यामुळे मी कांही इच्छूक नाही. पक्ष जे कांही काम देईल ते मी करीत राहणार आहे.’

BJP
Goa Covid 19: 'कोविड' च्या मृत्यूदरात देशात गोवा तिसरा

2005 ते 2012 या कालावधीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Former Chief Minister Manohar Parrikar) यांनी नियोजन केल्याप्रमाणे आता गोव्यात भाजप सत्तेवर आहे. प्रवेश दिला म्हणजे उमेदवारी मिळणार असे नाही. प्रत्येकाची चाचणी पार्लिमेंटरी बोर्ड करील, त्यानुसार उमेदवार ठरतील. राष्ट्रीय पक्ष असल्याने जिंकून येणाऱ्यांनाच उमेदवारी देण्याची जबाबदारी केंद्र समितीकडे आहे. एकदा उमेदवारी जाहिर झाल्यानंतर सगळ्यांनी त्याच्या मागे उभे राहिले पाहिजे, असे तानवडे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com