Goa Dairy Dispute Dainik Gomantak
गोवा

Cattle Feed Price: पशुखाद्यात दरवाढ, दूध उत्पादक आक्रमक; दोन दिवसांत तोडगा न काढल्यास सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा

Goa Dairy Dispute: पशुखाद्याच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ केल्याच्या निषेधार्थ ‘एफपीओ’ या गोवा डेअरीशी निगडित आस्थापनाच्या संचालकांनी ही दरवाढ दोन दिवसांत मागे घ्यावी.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: पशुखाद्याच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ केल्याच्या निषेधार्थ ‘एफपीओ’ या गोवा डेअरीशी निगडित आस्थापनाच्या संचालकांनी ही दरवाढ दोन दिवसांत मागे घ्यावी, अन्यथा एफपीओशी संबंधित दूध उत्पादक आपल्या संचालकपदाचा राजीनामा देतील, असा इशारा दिला.

शुक्रवारी या संचालकांनी गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच इतर संबंधितांची भेट घेऊन पशुखाद्य दरवाढीचा निषेध केला आणि वाढीव दर त्वरित रद्द करण्याची मागणी केली. या संचालकांपैकी एक असलेले वैभव परब म्हणाले की, संबंधित कंपनीने कुणालाही विश्वासात न घेता ही दरवाढ केली आहे. इतर पशुखाद्य कंपन्यांनीही दरवाढ केली आहे; मात्र ती कमी प्रमाणात आहे.

आताची दरवाढ अन्यायकारक असून, आधीच कंबरडे मोडलेल्या दूध उत्पादकांवर हा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी नमूद केले. चार महिन्यांपूर्वी पशुखाद्याच्या एका पिशवीचा दर १,५२५ रुपये होता. तो आता १,७२५ रुपये करण्यात आला आहे.

किलोमागे चार रुपयांची दरवाढ करण्यात आली असून, ही दरवाढ करताना संबंधित आस्थापनावरील दूध उत्पादक संचालकांना विश्वासात घेतलेले नाही. त्याच्या निषेधार्थ या संचालकांनी गोवा डेअरीला जाब विचारला. दरम्यान, येत्या दोन दिवसांत याप्रकरणी तोडगा न निघाल्यास सोमवारी सर्व शेतकरी संचालक सामूहिक राजीनामा देतील, असा इशारा गोवा डेअरीला यावेळी देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Agniveer Recruitment Data Leak: मोठी खळबळ! अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विकायचा डाव? 14 वर्षांच्या मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

Gurpatwant Singh Pannun Murder Plot: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट, अमेरिकन कोर्टाचा निखिल गुप्ताला झटका; सुनावली 20 वर्षांची शिक्षा

Marigold Farming: काणकोणात झेंडूचा बहर; 1,060 क्विंटल उत्पादन, स्थानिक फुलांना ग्राहकांची पसंती

SCROLL FOR NEXT