Goa Dairy Former Directors Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy: गोवा डेअरीच्या 14 माजी संचालकांचे पद धोक्यात,सहकार खात्याच्या उपनिबंधकांचा आदेश

Goa Dairy Former Directors: सहकार निबंधकांनी दिलेल्या निवाड्यानुसार अशा दूध सोसायट्यांवरील त्यांचे संचालकपद आपोआप बरखास्त होत असल्याचा आदेश सहकार खात्याच्या उपनिबंधकाने दिला आहे.

Sameer Panditrao

Goa Dairy former directors dismissed

फोंडा: गोवा डेअरीच्या अपात्र ठरविलेल्या १४ माजी संचालकांना दूध सोसायट्यांवर संचालक म्हणून राहण्याचा कोणताही अधिकार नसून सहकार निबंधकांनी दिलेल्या निवाड्यानुसार अशा दूध सोसायट्यांवरील त्यांचे संचालकपद आपोआप बरखास्त होत असल्याचा आदेश सहकार खात्याच्या उपनिबंधकाने दिला आहे.

हा विषय सहकार खात्यात सुनावणीसाठी आला असता सहकार निबंधकांनी या सर्व संचालकांना अपात्र ठरवण्याचा आदेश दिल्यामुळे त्यांना दूध सोसायट्यांवरील मंडळांवर संचालक म्हणून राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे सहकार खात्याच्या उत्तर विभागाच्या उपनिबंधक डॉ. म्रिशेल्दा मोंतेरो यांनी गेल्या २३ तारखेला गोवा डेअरी आणि संबंधित दूधसंस्थांना दिलेल्या आदेशवजा निवेदनात म्हटले आहे.

या आदेशानुसार राजेश फळदेसाई, विठोबा देसाई, गुरुदास परब, माधव सहकारी, धनंजय देसाई, माधवराव देसाई, बाबूराव देसाई, विजयकांत गावकर, शिवानंद पेडणेकर, राजेंद्र सावळ, उल्हास सिनारी, अजय देसाई, बाबू कोमरपंत, आसेल्मो फुर्तादो या १४ अपात्र संचालकांना दूध सोसायट्यांवरील संचालकपद सोडणे क्रमप्राप्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT