Goa Dairy: 'सुमुल'ला 32 लाखांची मदत मग 'गोवा डेअरी'ला मदत का नाही? सरकारचा खासगीकरणाचा डाव असल्याचा आरोप

Goa Dairy Privatization: गोवा डेअरीचे नुकसान वाढवून खासगी आस्थापनाकडे चालवण्यास देण्याचा सरकारचा इरादा असून डेअरीला नफ्यात आणण्यासाठी विद्यमान प्रशासक मंडळ बरखास्त करून नवीन संचालक मंडळाची निवडणूक घ्या, अशी जोरदार मागणी राज्यातील दूध उत्पादक संस्थांच्या अध्यक्षांनी केली.
Milk producing organizations in  Goa
Milk producing organizations in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Government accused of plotting to privatize loss-making Goa Dairy

फोंडा: गोवा डेअरीचे नुकसान वाढवून डेअरी खासगी आस्थापनाकडे चालवण्यास देण्याचा सरकारचा इरादा असून गोवा डेअरी ही राज्यातील दूध उत्पादकांची संस्था आहे, त्यामुळे गोवा डेअरीला नफ्यात आणण्यासाठी विद्यमान प्रशासक मंडळ बरखास्त करून नवीन संचालक मंडळाची निवडणूक घ्या, अशी जोरदार मागणी राज्यातील दूध उत्पादक संस्थांच्या अध्यक्षांनी केली.

फोंड्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दूध संस्थांच्या अध्यक्षांनी सरकार सुमुलला ३२ लाख रुपयांची मदत करते, मग गोवा डेअरीला १५ लाख रुपयांची मदत करण्यास का नकार देते, असा प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी जयंत देसाई, रमेश नाईक, प्रमोद सिद्धये, विकास प्रभू तसेच इतर दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गोवा डेअरी नफ्यात असल्याचा आव आणला जात असून हा नफा कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात डेअरी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. गोवा डेअरीच्या मुदत ठेवीवरील व्याज सुमारे दीड कोटी रुपये तर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन भरती केली नसल्याने सुमारे एक कोटी रक्कम वाचली असल्याने अडीच कोटी रुपये डेअरीकडे शिल्लक आहेत. तोच नफा दाखवला जात असून प्रत्यक्षात मात्र डेअरीच्या प्रगतीचा पत्ताच नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

गोवा डेअरीचे सात कोटी रुपये जादा व्याज मिळेल म्हणून पीएमसी बँकेत गुंतवण्यात आले, मात्र पीएमसी बँक कर्जबाजारी झाल्यामुळे हे पैसे अडकून पडले आहेत.

एनडीडीबीकडून मिळालेले पैसे परस्पर कसे काय बँकेत ठेवी म्हणून ठेवण्यात आले, अशी विचारणा करून एनडीडीबीने पंधरा कोटी रुपये जाहीर केले होते, त्यातील सात कोटी रुपये अदा केले, पण हे पैसेच ठेवीत गुंतवल्यामुळे आणि तेही बुडीत खात्यात गेल्यामुळे पुढील आठ कोटी रुपये मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

प्रशासक नेमले पण पूर्णवेळ कुठे...

राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांपासून डेअरीवर प्रशासक नेमले आहेत. मध्यंतरीच्या काळात संचालक मंडळासाठी निवडणूक झाली, पण निवडून आलेले संचालक भ्रष्टाचाराच्या वादात सापडले असल्याने पुन्हा एकदा प्रशासकीय समितीकडे ताबा देण्यात आला.

विशेष म्हणजे या समितीच्या सदस्यांना इतरत्र ताबा असल्याने धड हेही नाही आणि तेही नाही, अशी स्थिती आहे, त्यातच व्यवस्थापकीय संचालक अजून नेमलेला नाही, त्यामुळे डेअरीत अंदाधुंदी सुरू आहे, कुणाचा कुणाला पायपोस राहिला नसल्याचा आरोप करण्यात आला.

Milk producing organizations in  Goa
Goa Police: रात्री-अपरात्री पोलिस धडकणार घरी! 'गोव्या'त गुन्हेगारांवर करडी नजर; आठ दिवसांत १०५ जणांची चौकशी

सरकारचे ‘सुमुल’ला झुकते माप!

राज्य सरकारकडून सुमुल दूध संस्थेला झुकते माप दिले जात असून गोवा डेअरीला सापत्न भावाची वागणूक दिली जाते, असा आरोप दूध उत्पादकांनी केला. दूध उत्पादक सुमुलकडे कसे वळतील, याकडे सध्या काहीजणांचे लक्ष लागून राहिले आहे, पण गोवा डेअरीचे दूध शुद्ध असल्याने गोवा डेअरी ही गोमंतकीय दूध उत्पादकांची संस्था आहे, त्यामुळे डेअरी तग धरून उभी आहे, पण दूध उत्पादक खालावले असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com