Subhash Shirodkar Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy Payment: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांची रक्कम 30 जुलैपर्यंत देणार! 12 कोटींची तरतूद; सहकारमंत्री शिरोडकर

Subhash Shirodkar: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांची थकीत आधारभूत रक्कम येत्या ३० जुलैपर्यंत देण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिले.

Sameer Panditrao

फोंडा: राज्यात सहकार क्षेत्रात वाढ करताना रोजगाराला प्राधान्य देण्यात येत असून गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांची थकीत आधारभूत रक्कम येत्या ३० जुलैपर्यंत देण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिले. त्यासाठी सरकारने बारा कोटी सत्तर लाख रुपयांची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या सहकार खात्याच्या स्थापनादिनानिमित्त फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात रविवारी आयोजित कार्यक्रमात शिरोडकर बोलत होते. यावेळी आरबीआय संचालक मंडळाचे सदस्य सतीश मराठे, अनिवासी भारतीय आयुक्त तथा गोवा बागायतदारचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, माजी मंत्री तथा आदर्श सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश वेळीप तसेच सचिव यतिंद्र मराळकर, विजयकांत गावकर व सहकार निबंधक आशुतोष आपटे आदी उपस्थित होते.

शिरोडकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकारमंत्री अमित शहा यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्रात हरितक्रांतीप्रमाणे दुग्ध क्षेत्रातही श्वेत क्रांतीची आवश्यकता असून नवीन डेअऱ्या सुरू करण्यासाठी दूग्ध उत्पादकांनी प्रयत्न केले पाहिजे. आज सहकार ग्रामाची खरी गरज असून ग्रामीण भागातील गरजेनुसार वस्तूंची निर्मिती करण्याबरोबरच वितरणाचीही प्रभावी शैली विकसित व्हायला हवी. त्यासाठी युवा पिढीने सहकार क्षेत्रात मोठ्या संख्येने यायला हवे, असे ते म्हणाले.

सतीश मराठे यांनी सहकार क्षेत्राची उपलब्धी आणि वास्तविकता यावर बोट ठेवताना युवा पिढीचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. सहकार कायद्याचा सर्वसमावेशक वापर व्हायला हवा. तसेच सहकार प्रतिनिधींना वेळोवेळी प्रशिक्षण द्यायला हवे, असे ते म्हणाले. यावेळी यतिंद्र मराळकर यांनी सहकार क्षेत्राच्या वृद्धीसाठी सहकारमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निर्णय घेतले जात असून नवीन पिढीने सहकार क्षेत्रात सहभागी व्हावे असे सांगितले.

स्वागत व प्रास्ताविक आशुतोष आपटे यांनी केले. डॉ. गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात अनेक लाभार्थी सोसायट्यांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. यावेळी कला मंदिर परिसरात विविध स्टॉल्स थाटण्यात आले होते.

पतसंस्थांनी बहुउद्देशीय व्हावे !

गोव्यात कार्यरत पतसंस्थांनी केवळ पैशांची देवघेव करून किंवा कर्ज देऊन चालणार नाही, त्यासाठी पतसंस्था आणि बँकांनी बहुद्देशीय व्हायला हवे.

गोव्यात पर्यटन क्षेत्रात भरीव काम करण्याची संधी असून करोडो रुपयांच्या ठेवी ठेवाच पण नवनवीन उद्योगात शिरा आणि रोजगार निर्मिती करा, असे आवाहन सुभाष शिरोडकर यांनी केले.

१० तारखेपर्यंत दूध दरफरक

गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत दूध दरफरक देण्याचा सरकारचा कटाक्ष असून प्रत्येक दूध सोसायटीला संगणक देऊन त्यावर काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुलभ कसे ठरेल याबाबतही विचार केला जाणार असल्याचे सहकारमंत्री म्हणाले.

केरळप्रमाणे सहकार नीती अवलंबावी

केरळ राज्यात सहकारक्षेत्रात भरीव क्रांती झाली आहे. सहकार क्षेत्रात सर्वसामान्याला सहभागी करून या क्षेत्राची वाढ करण्यासाठी केरळमध्ये प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी केरळला भेट द्या आणि सहकार क्षेत्राचे निरीक्षण करा, असा सल्ला सतीश मराठे यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरो निओचा नवा अवतार लवकरच बाजारात; जाणून घ्या बदललेले डिझाइन, फीचर्स आणि संभाव्य किंमत

Seva Pakhwada: मंत्री रमेश तवडकर नाराज? राज्यस्तर 'सेवा पखवाडा' कार्यक्रमाला मारली दांडी

Viral Video: प्री-वेडिंगसाठी रोमँटिक पोझ देणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "समुद्रकिनाऱ्यावर जॉन सीनासोबत द रॉक!"

PM Modi Song: एक कर्मयोगी जो... मोदींवर आलं मराठी गाणं; अजय-अतुलनं दिलं संगीत; प्रमोद सावंतांनी शेअर केला व्हिडिओ Watch Video

ICC T20 क्रमवारीत मोठा फेरबदल! अभिषेक शर्मा नंबर 1 वर कायम तर सूर्या-तिलक वर्मा यांची घसरण

SCROLL FOR NEXT