Goa Airport | Dabolim Dainik Gomantak
गोवा

Goa Airport: दाबोळी परिसरात 'हायजॅकर्स'चा निषेध!

Dabolim Airport: विमानतळ परिसरात पोलिस गस्त वाढवून अशा हायजॅकर्सवर त्वरीत कारवाई करावी.

दैनिक गोमन्तक

Vasco: टॅक्सीचे भाडे हडप करून बेकायदा व्यवसाय करणाऱ्या हायजॅकर्सचा युनायटेड टॅक्सी मेन युनियनच्या दाबोळी विमानतळावरील काळ्या-पिवळ्या टॅक्सी ऑपरेटर्सच्या गटाने निषेध केला. विमानतळ परिसरात पोलिस गस्त वाढवून अशा हायजॅकर्सवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्‍यात आली.

दाबोळी विमानतळावरील टॅक्सीचालकांचा प्रश्न सोडविण्यास दाबोळी विमानतळ प्राधिकरण, दाबोळी पोलिस व लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांना अनेक समस्या भेडसावत आहे.

दरम्यान, त्‍यातील मुख्य समस्‍या म्‍हणजे तो हायजॅकर्सचा, जे चोरट्या मार्गाने दाबोळी विमानतळावरील भाडे हडप करून व्यवसाय करत आहेत, असा आरोप करून सुमारे ३५० टॅक्सीचालकांनी एकवटून या प्रकाराचा निषेध केला. तसेच या प्रकाराला त्‍वरित आळा घालावा, अशी मागणी सचिव प्रभुगावकर यांनी केली.

पोलिस स्थानकाच्‍या होमगार्डला दंड

दाबोळी विमानतळावर बेकायदा प्रवासी भाडे मारताना वास्को पोलिस स्थानकाचा होमगार्ड सय्यद दाऊद इस्माईल इब्राहिम याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. परवाना नसताना खासगी वाहनाने भाडे मारत असल्‍याबद्दल त्‍याच्‍याविरोधात दाबोळी विमानतळावरील पोलिस स्थानकात तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT