Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Crime: गोव्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण घटले? आर्थिक फसवणुकीबाबत पोलिसांची महत्वाची माहिती

Goa cybercrime rate: जानेवारी - मे च्या तुलनेत जून ते ऑक्टोबर दरम्यान सायबर गुन्ह्यात ३३.२ टक्के घट झाल्याचे राहुल गुप्ता यांनी सांगितले.

Pramod Yadav

Goa Cyber Crime

पणजी: गेल्या पाच महिन्यात गोव्यातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याचे गोवा पोलिसांनी म्हटले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मे २०२४ च्या तुलनेत जून ते ऑक्टोबर दरम्यान सायबर गुन्ह्यात घट झालीय. पोलिसांनी राबवलेल्या जनजागृती मोहिमेचा फायदा झाल्याचे गुप्ता म्हणाले.

जानेवारी - मे च्या तुलनेत जून ते ऑक्टोबर दरम्यान सायबर गुन्ह्यात ३३.२ टक्के घट झाल्याचे राहुल गुप्ता यांनी सांगितले. याकाळात फ्रॉड व्यवहार रोखण्याचे २४२ टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले. सायबर गुन्हेगारी विरोधात राबवलेल्या जनजागृती मोहिमेमुळे अशा घटना कमी झाल्याचा दावा गुप्तांनी केला.

सायबर गुन्ह्यांचे स्वरुप, प्रकार आणि विविध घटनांबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी सायबर सुरक्षित गोंय मोहिम राबवली. यासाठी पंचायत, शाळा, महाविद्यालये आणि उद्योगांची मदत घेतली. महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर या जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला. सोशल मिडियाची देखील बहुमोल मदत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सायबर गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच असे प्रकार उघडकीस आल्यास तात्काळ कारवाई करण्यासाठी विशेष टीमची स्थापना करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी विविध सायबर गुन्ह्यात राजस्थान, पश्चिम बंगाल, केरळ, हैद्राबाद आणि दिल्ली या राज्यातून ४६ जणांना अटक केलीय.

सायबर गुन्ह्याचे विविध प्रकार समोर येत आहेत. नागरिकांना पैशाचे आमिष देऊन व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनेलमध्ये एड केले जाते. यातून आर्थिक फसवणूक होते. याशिवाय हॅकिंग, ओटीपी शेअरिंग यासारख्या प्रकारातून फसवणूक होते, असे पोलिस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT