पणजी : सध्या सगळीकडेच ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत आणि गोवा याला अपवाद नाही. गोव्यातील एक जोडपं अलीकडेच ऑनलाईन फसवणुकीला बळी पडलं. गुंतवणुकीच्या संधींच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याने त्यांना तब्बल १.२ कोटी रुपयांचा गंडा घातला.
फेसबुकवर आलेल्या ज्युडिथ नावाच्या एक व्यक्तीची रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर हा एकूण घोळ सुरु झाला. या व्यक्तीने गोव्यातील त्या जोडप्याला फसव्या ऑनलाइन ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले आणि २०२४ पासून चालेल्या या फसवणुकीत जोडप्याने कोट्यवधी रुपये गमावले. सुरुवातीला केलेल्या छोट्याशा गुंतवणुकीतून जोडप्याला फायदा झाला आणि यामधूनच त्यांना आणखीन गुंतवणूक करण्याचे प्रोत्साहन मिळाले.
त्यांचा उत्साह बघून फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना गुंतवणुकीच्या आणखीन संधी दिल्या आणि गॅरंटीड रिटर्नसाठी काही पैसे भरण्याची मागणी केली. आपल्याला नुकसान होऊ नये म्हणून जोडप्याने देखील इथून-तिथून पैसे मिळवत कर्जाची रक्कम उभी केली.
एका दिवशी जेव्हा जोडप्याने गुंतवलेल्या पैशांमधला नफा काढण्याचा प्रयत्न केला असता घोटाळेबाजांनी त्यांच्यावर नवीन शुल्क लादले आणि परिणामी नफा मिळवणं या जोडप्यासाठी कठीण झालं. गोव्यातील या जोडप्याने बचतीचा बराचसा भाग गमावला आणि यावेळी मात्र जोडप्याला आपण मोठी रक्कम गमावल्याचं लक्षात आलं. या फसवणुकीत जोडप्याचे बचत, कर्ज आणि सोन्यासह १ कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले असल्याने त्यांनी संबंधित तक्रार पोलिसांकडे नोंदवली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.