Mopa Airport Drug Seizure Dainik Gomantak
गोवा

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Mopa Airport Drug Seizure: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (मोपा) सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (AIU) अंमली पदार्थ तस्करीचा एक मोठा डाव उधळून लावला.

Manish Jadhav

पणजी: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (मोपा) सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (AIU) अंमली पदार्थ तस्करीचा एक मोठा डाव उधळून लावला. 7 जानेवारी 2026 रोजी केलेल्या या कारवाईत तब्बल 3 कोटी 16 लाख रुपये किमतीचा 'हायड्रोपोनिक कॅनाबिस' (Hydroponic Cannabis) हा उच्च दर्जाचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला बेड्या ठोकण्यात आल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवासी बँकॉक येथून ताश्कंदमार्गे गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला होता. विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सीमा शुल्क विभागाच्या (Customs) अधिकाऱ्यांनी त्याला थांबवले. त्याच्याकडे असलेल्या सामानाची (Checked-in Baggage) सखोल तपासणी केली असता, त्यात लपवून ठेवलेली 9.036 किलो वजनाची हायड्रोपोनिक कॅनाबिसची पाकिटे आढळली.

जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत आहे. गांजाच्या तुलनेत 'हायड्रोपोनिक कॅनाबिस' हे मातीविना केवळ पाण्यावर आधारित विशेष तंत्रज्ञानाने पिकवले जाते. यात अंमली अंशाचे (THC) प्रमाण खूप जास्त असल्याने हा प्रकार अत्यंत महागड्या अंमली पदार्थांच्या श्रेणीत येतो. गोव्यात (Goa) सध्या पर्यटन हंगाम जोरात असल्याने अशा प्रकारच्या अंमली पदार्थांची मागणी वाढते, याचाच फायदा तस्कर घेत असल्याचे दिसत आहे.

सीमा शुल्क विभागाने जप्त केलेल्या मालाचे वजन आणि किंमत पाहता आरोपी प्रवाशाला तात्काळ अटक केली. त्याच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला. या तस्करीचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय टोळीशी जोडले गेले आहेत का, याचा तपास आता 'एआययू' आणि अंमली पदार्थ विरोधी पथकामार्फत केला जात आहे.

गोव्याचे नवे विमानतळ असलेल्या मोपा येथे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. विमानतळ सुरु झाल्यापासून अंमली पदार्थांच्या विरोधात केलेली ही आतापर्यंतची मोठी कारवाई मानली जात आहे. सीमा शुल्क आयुक्तांनी या यशस्वी कारवाईबद्दल पथकाचे कौतुक केले असून विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक संशयास्पद आंतरराष्ट्रीय प्रवाशावर आमची करडी नजर असल्याचे स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT