Rohan khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa News: नंदा तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास साधणार- रोहन खंवटे

Goa News: नंदा तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करुन रोजगार निर्मितीवर भर देणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: नंदा तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करून रोजगार निर्मितीवर भर देणार आहे,असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. ‘मंत्री तुमच्या दारी’ या उपक्रमांतर्गत काल त्यांनी केपे व कुडचडे मतदारसंघाचा दौरा केला.

कुडचडे (Curchorem) येथील नंदा लेक तसेच काकोडा येथील महादेव देवस्थानला भेट देऊन परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास कसा साधता येईल, याची पडताळणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल, नगराध्यक्ष जास्मिन ब्रागांझा, स्थानिक नगरसेवक विश्वास सावंत व इतर नगरसेव, अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले होते.

नंदालेक ची पाहणी केल्यानंतर मंत्री रोहन खंवटे (Rohan khaunte) यांनी सांगितले,की जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री तुमच्या दारीं उपक्रम राबवून खेड्यापाड्यात जाऊन थेट जनतेशी संपर्क साधता आला. केपे तालुक्यात असलेल्या मंदिर, चर्च परिसरात निसर्ग पर्यटन सुरु करता येईल का, त्यातून स्थानिकांना रोजगार निर्मिती कशी होईल, या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

केपे तालुक्यातील पर्यटनस्थळांना चालना देऊन स्थानिकांना विश्वासात घेऊन रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल, आणि माहिती तंत्रतज्ञान खात्यांतर्गत सिग्नल मध्ये सुधारणा घडवून आणली जाईल. कुडचडे मतदारसंघात निलेश काब्राल यांनी कौतुकास्पद अशी कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले. केपे तालुका दौरा नक्कीच चांगला झाल्याचे मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले.

नीलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाम मंत्री-

कुडचडे मतदारसंघात पर्यटन (Tourism) दृष्टीने विकास कसा आणि कुठे करता येईल, याची आज पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी मंत्री तुमच्या दारीं या उपक्रमांतर्गत पाहणी केली. येत्या काळात या विचारांना चालना मिळेल. काकोडा येथील श्री महादेव मंदिराला भेट दिली. काकोडा परिसरात अनेक मंदिरांचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा मंत्री खंवटे यांना भेट देण्याची विनंती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT