Dudhsagar River: 'दुधसागर' पुन्हा गढुळ; नागरिक धास्तावले

पाणी अपायकारक ठरल्यास याला जबाबदार कोण?
Dudhsagar River
Dudhsagar RiverDainik Gomantak
Published on
Updated on

दूधसागर नदीचे गेल्या काही दिवसांपासुन पाणी गढूळ येत असुन, आज पुन्हा असाच प्रकार घडला आहे. स्थानिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. या पाण्याचा वापर आम्ही पिण्यासाठी करत असुन प्रशासनाने यावर उपाय काढावा असे नागरिकांचे मत आहे. काही दिसांपुर्वी मंत्री सुभाष शिरोडकर यांनी याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

(Dudhsagar river's water once again impure)

Dudhsagar River
Taxi App will be launched in Goa : गोवा सरकार लवकरच लॉन्च करणार नवं टॅक्सी अॅप

दूधसागर नदीचे पाणी गढूळ का? याबाबतचा अहवाल कधी सादर केला जाणार आहे. याबाबत उपाय योजना कधी केल्या जाणार याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र दुधसागर नदीचे पाणी पुन्हा गढुळ, आणि माती मिश्रित असल्याने हे जलस्त्रोत खात्याचे अपयश असल्याचे नदीक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी म्हटले आहे.

Dudhsagar River
Goa Road Issue: कदंब पठारावरील रस्‍ता 'ब्लॅक स्पॉट' म्हणून घोषित!

मंत्र्यांनी आदेश दिले, अधिकाऱ्यांना तपासणी करण्यास सांगितले आहे. यानंतर तरी हा प्रश्न सुटणार आहे का ? असा सवाल आता स्थानिक करत आहेत. गेल्या काही दिवसांपासुन हा प्रकार सुरु असुन या नदीच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांना हे अपायकारक ठरल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता नागरिक विचारु लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com