Goa Electric Vehicle: गोवा राज्यात 'ई-वाहन' खरेदीला वेग!

Goa Electric Vehicle: राज्यात पुन्हा एकदा ई- वाहन इलेक्ट्रिक खरेदीला वेग आल्याचे दिसून येत आहे.
Goa Electric Vehicle
Goa Electric VehicleDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Electric Vehicle: ई - वाहन खेरदीवर मिळणारा अनुदान निधी बंद होण्याच्या धक्क्यातून ग्राहक सावरल्याचे राज्यात पुन्हा एकदा ई - वाहन इलेक्ट्रिक (Electric) खरेदीला वेग आल्याचे दिसून येत आहे. गोवा सरकारने ऑगस्टपासून ‘अनुदान बंद’चा निर्णय घेतल्यानंतर ग्राहकांची निराशा झाली होती. ऑगस्टमध्ये ई-वाहन व्यवसायाला त्याचा फटका बसल्याचे दिसून आले होते. परंतु सप्टेंबरमध्ये खरेदीत वाढ झाली आहे.

अनुदान बंद होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर लोकांनी एकच गर्दी करून वाहन खरेदी केली होती. त्यामुळे जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात ई- वाहन विक्री झाली होती. परंतु अनुदान बंद झाल्याचे पडसाद ऑगस्टमध्ये उमटल्याचे दिसून आले, कारण जुलैच्या 688 च्या तुलनेत केवळ 354 वाहन ऑगस्टमध्ये नोंद झाली आहेत.

Goa Electric Vehicle
Goa News: बागायतदार शेतकऱ्यांची नारळाकडे पाठ!

मात्र सप्टेंबरमध्ये यात आणखी भर पडली असून एकूण 446 ई - वाहनांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती केंद्राच्या वाहन संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गोवा सरकारकाडून दुचाकी ई - वाहनांवर 22 हजार रुपये अनुदान मिळत होते, तर चारचाकी वाहनांवर सुमारे 3 लाख रुपये मिळत होते.

परंतु ही योजना बंद झाल्याने ग्राहकांचा अपेक्षाभंग झाला होता. मात्र केंद्र सरकारने (Central Government) आपल्या अनुदान निधीत वाढ केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ई - वाहन खेरदीत वाढ झाली आहे. येत्या काळात रस्त्यांवर ई - वाहन संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Goa Electric Vehicle
Vasco Crime: सात लाखांचे अमली पदार्थ जप्त; एकाला अटक

करणजीत सिंग, मालक ॲथर शोरूम, पर्वरी-

ऑगस्टमध्ये फटका बसल्यानंतर सप्टेंबर पुन्हा ई -वाहन खरेदी वाढली आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये आणखी वाढ नोंदली जाण्याची शक्यता आहे. अनुदान निधीपेक्षा ई - वाहनांचे फायदे जास्त आहेत,हे ग्राहकांच्या लक्षात येत आहे. एका चार्जनंतर वाहन 105 किमी चालते. 2025 पर्यंत 30 ते 40 टक्के मार्केट शेअर असणार आहे.

वेंकटेश मराठे, विक्री व्यवस्थापक, दुर्गा मोटर्स, पर्वरी-

गोवा सरकारने (Goa Government) अनुदान बंद केल्याचा थोडा फटका बसला आहे, परंतु आता पुन्हा ई - वाहन खरेदी वाढली आहे. आता चारचाकी श्रेणीत नवीन वाहने दाखल झाल्याने ग्राहकांचा उत्साहही वाढला आहे. त्यात काही चारचाकींचे दरही मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात ठेवल्याने मागणी वाढत आहे.

राज्यातील ई - वाहनांची संख्या (15 सप्टेंबर 2022 पर्यंत)

दुचाकी 3989 , तीन चाकी 41, चार चाकी 774, बसेस 50, मालवाहू 23, इतर 02, एकूण 4879

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com