पर्ये : गोव्यातील (Goa) धनगर गवळी समाज बऱ्याच प्रमाणात विखुरलेला आहे. पूर्वी काळी हा समाज डोंगर दऱ्यात राहायचा पण आता तो गावामध्ये स्थायिक झालेला आहे. या समाजाचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे नवरात्र व दसरा (Dussehra festival) हा समाज हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात.
इथल्या धनगर गवळी समाजाची दसऱ्याची सुरुवात घटस्थापनेच्या दिवशी होते. या पहिल्या दिवशी घरातील देव्हाऱ्यात कुलदेवतेचे पूजन केले जाते आणि नंतर नऊ दिवस रात्री गजा नृत्य, फुगडी घालून रात्री जागवल्या जातात. या कुलदेवतेच्या पूजनाच्या माथ्यावर माटोळी बांधण्याची परंपरा आहे. या माटोळीला नारळ आणि जंगलातील रान फळे-फुले बांधण्याची परंपरा आहे . नवव्या दिवशी घराच्या बाहेर पाटी पूजनाचा विधी होतो. त्या रात्री आपल्या वस्तीवरील समाज बांधव प्रत्येक घरोघरी फिरून गजा नृत्य सादर करतात. ढोल आणि थाळीच्या गजरात हे विशिष्ट प्रकारचे आहे. या नृत्यात पायांचा ताल आणि हातांचे हातवारे हे मुख्य आकर्षण असते. तर नृत्य करीत असताना 'हरे गजा चांगभलं' हे वाक्य विशिष्ट लयीत म्हणतात.
धनगर समाज हा म्हशीं व शेळी पालन असल्याने गजा नृत्यात या प्राण्यांचे हावभाव दिसतात. या भागात या नृत्याला 'चपय' नृत्य म्हणून संबोधले जाते. यात पुरुष मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या दसऱ्याला धनगरी स्त्रिया धनगरी फुगडी घालतात. दसऱ्या दिवशी पाटी पूजनाचे विसर्जन करून यांच्या दसऱ्याची सांगता होते.
आजच्या या बदलत्या काळात गोमंतकीय धनगर गवळी समाजाची राहणीमान बदलत चालली असताना देखील यांचा गजा नृत्य सादर करण्याची परंपरा अजूनही सुरू आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.