पणजी: कृषी उत्पन्न आणि अन्न निर्मिती क्षेत्रात (Goa Agricultur) राज्य आजही शेजारील राज्यावर अवलंबून आहे. यासाठी राज्य सरकारने स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न पाहिले आहे. यात जनतेने सहभागी व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. अन्नधान्य क्षेत्रात राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी नागरिकांबरोबर शास्त्रज्ञांचाही सहभाग आहे.
आज जागतिक अन्न दिनानिमित्त गोव्याचा विचार करता येथे लागणारा 80 टक्के भाजीपाला आणि कडधान्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आणावी लागतात. त्यात भाजी, फळे, गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी यांचा समावेश आहे. याशिवाय मासे, चिकन, अंडी, मटन, बीफ, विविध पीठे, साखर, तयार अन्न यांचाही समावेश आहे. मात्र पोर्तुगीज काळात गोवा स्वयंपूर्ण होता मग आताच ही परिस्थिती का निर्माण झाले यासाठी गोमंतकीयांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेबरोबर स्वयंपूर्ण गोव्याची घोषणा केली आहे. आणि त्यानुसार प्रयत्न सुरू झाले आहेत. कृषी उत्पादन वाढीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना विविध बाबींवर अनुदान देण्यासोबत शेती प्रोत्साहनासाठी आधारभूत किंमत दिली जात आहे. याशिवाय अवजरे , खते बीबियाणे उपलब्ध केली आहेत. या कृषी स्वयंपूर्णतेसाठी कृषी शास्त्रज्ञ, व्यक्ती कार्यरत आहे. त्यात डॉ ए आर देसाई, डॉ. परवीन कुमार, डॉ आर रमेश, डॉ. के मनोहर, गणेश चौधरी, यांचे योगदान मोलाचे आहे. आहे
स्थानिक भाजी उत्पादनावर भर; प्रवीण कुमार
केंद्रीय किनारी कृषी संशोधन केंद्राचे संचालक संचालक डॉ. प्रवीण कुमार म्हणाले, भाजीपाला उत्पादनामध्ये परराज्यावर अवलंबून आहे. हे थांबवण्यासाठी स्थानिक कृषी उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची गरज आहे. स्थानिक जातींच्या संशोधनासोबत बाहेरील वेगवेगळ्या भाज्यांच्या जातींचे प्रयोग गोव्यात सुरू आहेत. त्यात बटाटा, कोबी, तांबडी भाजी, मुळा, पालक, मिरची यांचा समावेश आहे. सध्या टेरेस गार्डनसाठी आम्ही प्रयत्नशील असून, प्रत्येक घरांवर टेरेस गार्डन केल्यास त्याचा फायदा स्थानिकांना ताज्या भाज्या मिळण्यात होईल.
आंब्यावर संशोधन...
डॉ. ए. आर. देसाई, हे फळ संशोधन शास्त्रज्ञ आहेत. फळांचे उत्पादन वाढीबरोबर त्याची प्रत, टिकाऊपणा, चव याकडे लक्ष देऊन त्यांनी काजूच्या चार जातींचा शोध लावला आहे. काजू 1,2,3,4 या त्या नवीन काजू जाती. यातील काजू 3 आणि 4 ह्या जाती चांगले असून काजूगर आणि बोंड दोन्ही उत्तम असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत आहे. या जाती बाल्ली आणि गांजे इथल्या स्थानिक जातींची संकर केलेल्या जाती असल्याने गोव्यातल्या हवामानाशी त्या चांगले उत्पन्न देत आहेत. सध्या ते आंब्यावर संशोधन करत आहेत.
भात शेतीसंबंधी महत्त्वपूर्ण काम...
डॉ. के मनोहर, हे अन्नधान्य शास्त्रज्ञ असून प्रामुख्याने भात शेतीवर संशोधन करतात. त्यांनी भाताच्या गोवा धान 1,2,3,4 या जातींचा शोध लावला आहे. यातील गोवाधान 3,4 या जाती क्षारपड जमिनीत सुद्धा चांगले उत्पन्न देतात. या जाती कोरगुड,कुरबाट आणि स्थानिक जातींची संकर केलेले आहे त्यामुळे त्या क्षारपड जमिनीत बरोबर सर्वच प्रकारच्या जमिनी मध्ये चांगले उत्पन्न देतात. तर दुसरीकडे डॉ. आर.रमेश आणि गणेश चौधरी हे भाजी वर संशोधन करत असून त्यांनी प्रामुख्याने वांग्याच्या तीन जाती शोधले आहेत. या बरोबरच आळसाणे आणि तांबडी भाजीची एक जात गोव्यातल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली आहे.
आजही उपासमार सुरूच...
जगभरातल्या 80 कोटी उपाशी लोकांपैकी 62 टक्के लोक आशिया खंडात राहातात. यामुळे कृषी उत्पादन वाढीबरोबरच अन्नधान्यांचा संरक्षण, योग्य वापर यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण हाच आशिया खंड कृषी क्षेत्रातील उत्पादनाबाबत अग्रेसर आहे. मात्र एकतृतीयांश टक्के अन्नाची नासाडी होते. तसेच अन्न टाकले जाते. यामुळे अन्न वाया जाण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोना काळात जगभरातल्या 140 कोटी लोकांची उपासमार झाली. आणि ती आजही सुरू आहे, असल्याचे जागतिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.