‘आपत्ती उपायासंदर्भात पालिकांना कार्यप्रवण करा’

गोवा कॅनकडून अर्बन आक्टोबर जागृती मोहीम राबविली जात असून त्याचाच एक भाग म्हणून ही सूचना केली आहे.
Goa Municipalities
Goa MunicipalitiesDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : गोवा कॅनने आंतरराष्ट्रीय आपत्ती शक्यता घटविणे दिनानिमित्ताने गोव्यातील नगरपालिकांना (Goa Municipalities) यासंदर्भात आवश्यक ते उपाय योजण्याची गरज प्रतिपादली असून तशा आशयाचे एक पत्र पालिका संचालकांना पाठविले आहे. गोवा कॅनकडून अर्बन आक्टोबर जागृती मोहीम राबविली जात असून त्याचाच एक भाग म्हणून ही सूचना केली आहे. सर्व नागरी संस्थांना त्यासंदर्भात कार्य प्रवृत्त करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.

Goa Municipalities
वेळूस-सत्तरीत दसऱ्याला गालबोट; रवळनाथाच्या मंदिराला ठोकले टाळे

पालिका बैठकीत आपत्ती शक्यता कमी करण्याबाबत उपाय योजण्याची सूचना करावी, प्रत्येक सहा महिन्यांनी बैठकीत झालेल्या चर्चेचे इतिवृत्त सादर करावे, पालिकांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी सज्ज राहाण्यासाठी योजावयाच्या उपायांचा अहवाल तयार करण्यास सांगावे, साबांखाला पालिका कक्षेतील धोकादायक इमारतींची यादी तयार करण्यास तसेच तेथे आखलेल्या सुरक्षा उपायांची माहिती सांगावी. ते करताना शाळा, इस्पितळे, बसस्थानक, उड्डाणपूल यांना प्राधान्य द्यावे. अशा इमारती शोधून तेथे लोकांना माहिती देण्यासाठी फलक लावावेत. अशा आपत्तीप्रसंगी मदतीसाठी येऊ शकणाऱ्या संस्था, संघटना, ग्राहक मंच व इतरांची यादी तयार करण्यास सांगावे, असेही या पत्रात म्हटले आहे. या पत्राच्या प्रती गोवा कॅनने मुख्य सचिव, पालिका प्रशासन खात्याचे सचिव, साबांखाचे प्रधान मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी यांना पाठविल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com