Goa culture one crore donation coupons of quepem Ganeshotsav sold Dainik Gomantak
गोवा

पहिल्याच दिवशी केपे गणेशोत्सवाची एक कोटींची देणगी कुपन्स खपली

कुपन्स विकत घेण्यासाठी सकाळपासून लोकांची रांग

दैनिक गोमन्तक

केपे : केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आजपासून देणगी कुपन विकण्यास सुरवात केली. पहिल्याच दिवशी या मंडळाने एक कोटी रुपयांची कुपन्स विकली. ही तिकिटे विकत घेण्यासाठी आज सकाळपासून लोकांनी रांगा लावल्या होत्या.

लोकांमध्ये विश्वास संपादन केल्याने दर वर्षी त्यांच्या देणगी कुपनाला राज्यात कुठेही न मिळणारा प्रतिसाद लाभतो. देणगी कुपन घेण्यासाठी लोकांची झुंबड उडते व हे चित्र फक्त केपेतच पाहायला मिळते असे उद्गार समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. ते केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देणगी कुपन शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी केपेचे माजी आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, नगराध्यक्ष सुचिता शिरवइकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप,नगरसेवक दयेश नाईक, अमोल काणेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एकोपा जपला असून मंडळाच्या कार्यात सर्व जातिपंथाचे लोक एकत्र येऊन काम करताना दिसतात असे फळदेसाई यांनी सांगितले. या मंडळाची देणगी कुपन फक्त गोव्यात प्रसिद्ध नसून शेजारील राज्यातही बरीच प्रसिद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 35 वर्ष असून या पस्तीस वर्ष्यात या मंडळाने बरीच मजल मारली आहे असे बाबू कवळेकर यांनी सांगितले. कोणतीही संस्था सुरू करणे सोपे असून ती टिकवून ठेवणे कठीण आहे पण हे मंडळ लोकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची मुहूर्तमेढ रोवली होती व ती आज पर्यंत देशभरात तसेच विदेशात सुद्धा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळपासून रांग

आज सकाळपासून लोकांनी केपे येथे देणगी कुपन विकत घेण्यासाठी गर्दी केली होती. पालिका उद्यानाला जणू जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पालिका उध्यानात लोकांची झुंबड उडाली होती तसेच लोकांनी देणगी कुपन घेण्यासाठी उध्यानाच्या सभोवताली रांग केली होती.

राज्यात बऱ्याच ठिकाणी देणगी कुपन काढली जातात पण केपे गणेशोत्सव मंडळाची कुपन घेण्यासाठी आज लोक सकाळपासून उभे होते आजच्या सुरुवातीच्याच दिवशी कुपन विक्रीतून मंडळाने एक कोटी रुपयांचा आकडा पार केला. उद्या ही सर्व (एक लाख)कुपन विकली जाणार असल्याचे चित्र दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By- Election: आम्ही चालवू पुढे 'बाबां'चा वारसा! रितेशनी घेतला रवींच्या कार्यालयाचा ताबा, उमेदवारीबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य

Horoscope: 'या' 3 राशींचे नशीब चमकणार! गुरु-शुक्र केंद्र योग देणार अफाट यश आणि धनलाभ; करिअर आणि व्यवसायातही होणार मोठी प्रगती

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! कोकण रेल्वे स्टेशनजवळ दुचाकींच्या धडकेत पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आरोपी फरार

Goa Today's News Live: गोव्याचा 'अभिनव' पुन्हा चमकला, पंजाबविरुद्ध झळकावलं दमदार शतक!

Amazon Layoffs: टेक विश्वात खळबळ! ॲमेझॉनने 14 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, दोन टेक्स्ट मेसेज पाठवून केली सर्वात मोठी कर्मचारी कपात

SCROLL FOR NEXT