Goa Culture Dainik Gomantak
गोवा

Goa Culture : राज्यातील ६४ कला प्रकार आमच्‍या संस्कृतीचे दायज : गावडे

Goa Culture : म्हापसा येथे दैवज्ञ राजभोग महोत्सवाचे उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Culture :

म्हापसा गोव्यातील ६४ कलांचे प्रकार हे आमचे संस्कृतीचे दायज आहेत, ते जगाच्या नकाशावर फडकावण्याचे कार्य आमचे कलाकार करीत आहेत.

या कलाकारांना योग्य व्यासपीठ गरजेचे असते, असे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

अखिल गोमंतक दैवज्ञ सुवर्णकार कारागीर संघाने कला व संस्कृती खात्याच्या संयुक्त विद्यमाने म्हापसा येथील श्री बोडगेश्वर देवस्‍थानच्‍या पटांगणावर आयोजित दोन दिवशीय दैवज्ञ राजभोग महोत्सवाचे उद्‍घाटन कार्यक्रमात गावडे बोलत होते.

यावेळी मत्‍स्‍योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर, उपनगराध्यक्ष विराज फडके, नगरसेवक चंद्रशेखर बेनकर, निवृत्त पोलिस अधिकारी तुकाराम वाळके, संघाचे अध्यक्ष औदुंबर पिंगुळकर, सचिव संजय चोडणकर, खजिनदार लक्ष्मिकांत शिरोडकर व रितेश कारेकर उपस्थित होते.

मंत्री निळकंठ हळर्णकर व नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. स्पर्धातील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. सुरूवातीला मंत्री गावडे व हळर्णकर यांच्या हस्ते मंडपाची फीत कापण्यात आली व नंतर समई प्रज्वलन करून समाजाची आराध्य दैवत माता कालिका देवीचा आशीर्वाद घेण्यात आला.

सूत्रसंचालन गजानन लोटलीकर यांनी केले. आभार अध्यक्ष औदुंबर पिंगुळकर यांनी मानले. या दोन दिवशीय महोत्सवात विविध स्पर्धा आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय खाद्य पदार्थांचे स्टॉल्स देखील उभारण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

Pakistan Cricket: मालिकेत लाजिरवाणा पराभव, आता खेळाडूंचे फोनही जप्त! PCB चा अजब कारभार; पाकिस्तान क्रिकेटमधील वाद काय संपेना

National Teacher Award: 'विशेष' कार्य करणाऱ्या गुरूंचा सन्मान; मडगावच्या महादेव शिंदेंना राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

Mapusa Theft: म्हापशात चोरट्यांचा धुमाकूळ! एका रात्रीत 8 दुकाने आणि फ्लॅट फोडला; लाखोंचा मुद्देमाल लंपास

Goa Ujjwala Scheme: गोमंतकीयांसाठी खुशखबर! गुरुवारपर्यंत सिलिंडरचे पैसे खात्यात; 2.50 लाख कुटुंबांना मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT