Goa Crypto Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Lavish Choudhary Dubai Mastermind Arrested: गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक करणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आले असून, याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली.

Manish Jadhav

पणजी: गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक करणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आले असून, याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. क्रिप्टो करन्सी आणि विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून गोव्यातील गुंतवणूकदारांना तब्बल 7 कोटी 36 लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दुबईत बसलेल्या मुख्य सूत्रधारासह एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, या महाघोटाळ्याचा मुख्य सूत्रधार लॅव्हिश चौधरी हा असून तो सध्या दुबईतून या संपूर्ण काळ्या करामतींचे नियंत्रण करत होता. आरोपींनी गोव्यातील लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी 'बॉटब्रो' (Botbro), 'क्यूएफएक्स ट्रेड' (QFX Trade) आणि 'माइनक्रिप्टो' (Minecrypto) नावाच्या खोट्या आणि बोगस गुंतवणूक कंपन्या स्थापन केल्या होत्या. 2020 ते 2025 या पाच वर्षांच्या कालावधीत या कंपन्यांच्या माध्यमातून आरोपींनी राज्यभरातील शेकडो लोकांना गाठले. "क्रिप्टो स्कीम्समध्ये पैसे गुंतवा आणि अल्पावधीतच दुप्पट किंवा तिप्पट नफा मिळवा," असे खोटे आमिष या टोळीने दाखवले. सुरुवातीला काही लोकांना विश्वास संपादन करण्यासाठी परतावा दिला गेला.

गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारींनंतर आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी केली, ज्यामध्ये हा कोट्यवधींचा घोटाळा समोर आला. त्यानंतर पोलिसांनी मुख्य सूत्रधार लॅव्हिश चौधरी आणि त्याच्या इतर 10 साथीदारांविरुद्ध रीतसर गुन्हा नोंदवला. या सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि 'गोवा डिपॉझिट प्रोटेक्शन ॲक्ट' (Goa Deposit Protection Act) च्या विविध कडक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले.

या बनावट कंपन्यांनी लोकांकडून जमा केलेला पैसा कुठे वळवला आणि यात गोव्यातील (Goa) स्थानिक एजंट्सचा सहभाग आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून युद्धपातळीवर सुरु असून आरोपींना अटक करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT