केरी सत्तरी येथे पर्यटकांची गर्दी/ वाहनांच्या रांगा Dainik Gomantak
गोवा

Goa: केरी सत्तरी चेक नाक्यावर पर्यटकांची गर्दी

अनमोड घाट बंद झाल्याने चोर्ला घाटातून गोव्यात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली, शनिवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या मार्गाने गोव्यात येत असून त्यामुळे ही गर्दी उसळली आहे.

दैनिक गोमन्तक

पर्ये: गोव्यात (Goa) येण्यासाठी अनमोड घाट (Anmod Ghat) अवजड व अतिअवजड वाहनांसाठी बंद केल्याने चोर्ला घाटातून (chorla ghat) वाहतूक वाढली आहे व त्याचा परिणाम केरी सत्तरी (Keri Sattari) चेक नाक्यावर पोलिस (check post) परराज्यातून गोव्यात प्रवेश करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. गोव्यात प्रवेशासाठी covid negative अहवाल आवश्यक असल्याने केरी चेक नाक्यावर covid तपासणीसाठी गर्दी उसळली आहे त्यामुळे त्याचा ताण आता केरीतील यंत्रणेवर येत आहे.

गोव्यात अनमोड घाटातून येत असलेल्या प्रवासी बसेस आता चोर्ला घाटातून यायला सुरुवात झाल्याने केरी चेक नाका व घाटात वाहनांची मोठी रांग लागलेली पाहायला मिळते. तसेच आज शनिवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या मार्गाने गोव्यात येत असून त्यामुळे ही गर्दी उसळली आहे.

एका बाजूने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोव्यात प्रवेशासाठी कॉविशील्डच्या दोन्ही लसी घेतलेल्याना प्रवेश द्यावा अशी वक्तव्य केले गेले. पण चेक नाक्यावर असा कोणताही आदेश नसल्याने येथे मात्र कडक तपासणी होते. गोव्यात येणारे बहुतेक जणांकडे covid चे negative अहवाल नाही. अशांना या ठिकाणी अहवाल काढण्यासाठी बराच वेळ टकळत राहावे लागते त्यामुळे ही गर्दी निर्माण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT