Goa molestation attempt Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: व्हेंटिलेटरच्या छिद्रातून कपडे बदलताना अल्पवयीन मुलीचा Video काढण्याचा प्रयत्न; परप्रांतीयावर गुन्हा दाखल

minor girl privacy violation: किर्लपाल दाभाळ येथील एका खासगी फार्ममध्ये कपडे बदलत असताना एका अल्पवयीन मुलीचा व्हेंटिलेटरच्या छिद्रातून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न झाल्याची घटना

Akshata Chhatre

कुडचडे: गोव्यातील कुडचडे येथे एका फार्म हाऊसवरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किर्लपाल दाभाळ येथील एका खासगी फार्ममध्ये कपडे बदलत असताना एका अल्पवयीन मुलीचा व्हेंटिलेटरच्या छिद्रातून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वास्को येथील पीडित मुलीच्या आईने कुडचडे पोलीस ठाण्यात सचिन कुमार (रा. उत्तर प्रदेश) नावाच्या व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी फार्म हाऊसवरील चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत होती. त्याचवेळी आरोपी सचिन कुमारने व्हेंटिलेटरच्या छिद्रातून तिच्याकडे डोकावून पाहण्याचा आणि तिला चित्रीत करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलीच्या निदर्शनास आल्यानंतर तिने तात्काळ आपल्या आईला सांगितले.

या घटनेमुळे संतापलेल्या आईने तात्काळ सचिन कुमारला पकडले आणि त्याला कुडचडे पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सचिन कुमार विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

कुडचडे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अशा घटनांमुळे सार्वजनिक ठिकाणी आणि खासगी जागांवरही महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.

जोडपे चक्क सार्वजनिक ठिकाणी कपडे बदलताना आढळले

काही दिवसांपूर्वी गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या कळंगुटमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. येथील एका कपड्याच्या शॉपमध्ये एक जोडपे चक्क सार्वजनिक ठिकाणी कपडे बदलताना आढळले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून अशा प्रकरणावर संताप व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT