Goa Crime: Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: आई आणि मुलीचा विनयभंग करणाऱ्या म्हापशातील दोघा जणांना अटक

कोलवाळ पोलिसांची कारवाई

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Crime: आई आणि मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोघेही म्हापशातील रहिवासी आहेत. या प्रकरणी संबंधित पीडीत महिलेने तक्रार दाखल केली होती.

म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. त्या तक्रारीत म्हटले आहे की, या दोघाही आरोपींनी तिच्यासह तिच्या मुलीचा विनयभंग केला. त्यांना शिव्या दिल्या. घाणेरडे शब्द वापरले तसेच शरिरसुखासाठी विचारणा केली.

कोलवाळ पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. 354, 509, 506(ii) R/w 34 IPC या कलमांनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहरूख करेली (वय 24) आणि मोहम्मद इलाही (वय 25) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी करेली हा धुळेर, म्हापसा येथील रहिवासी आहे.

तर इलाही हा करासवाडा, म्हापसा येथील रहिवासी आहे. या दोघाही आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक भारत खरात या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: गेल्या 65 वर्षांच्या गोव्याच्या बदललेल्या चित्रात गोवेकर कुठेच आढळत नाही; मग ‘अस्मिताय’, ‘अस्मिताय’ हे कशाला म्हणायचे?

अग्रलेख: गोव्याच्या किनाऱ्यांवर वरवर 'निळा समुद्र' दिसतो; परंतु त्याखाली 'नशेचे काळे पाणी' खदखदत आहे..

Mayem: "आमची शेती जिवंत करा, अन्‍यथा खाणीवर धडक देऊ"! मयेतील शेतकरी आक्रमक; महिनाभराची दिली मुदत

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पात्रांवचा वारसदार कोण...

Fatorda: हृदयद्रावक! बेडरूमचे दार लावले, बाल्कनीतून घेतली उडी; फातोर्ड्यात 73 वर्षीय वृद्धाने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT