Goa Crime: Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात सापडलेला 'तो' मृतदेह केरळच्या जेफ याचाच! डीएनए अहवालातून सत्य आले समोर

नोव्हेंबर 2021 मध्ये बेपत्ता झाला होता

Akshay Nirmale

Goa Crime: गोव्यात सापडलेला मृतदेह जेफ याचाच असल्याचे डीएनए अहवालातून स्पष्ट झाले आहे. जेफ हा कोची (केरळ) येथील रहिवासी होता. त्याच्या काही मित्रांनी मिळून त्याचा गोव्यात खून केला होता.

दोन वर्षांपूर्वी गोव्यात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर हा मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजमध्ये अभ्यासासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर डीएनए अहवालातून हा मृतदेह जेफ याचाच असल्याचे सिद्ध झाले आहे.

अन्य एका प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जेफच्या हत्येची पुष्टी पोलिसांनी केली. कोची पोलिसांनी हा तपास केला. पोलिसांनी या प्रकरणातील पाचही आरोपींना अटक केली आहे.

नोव्हेंबर 2021 मध्ये जेफ बेपत्ता झाला होता. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला होता.

दरम्यान, एका गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीने एक गोपनीय माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जेफच्या मित्रांवर तपास केंद्रित केला.

शेवटच्या फोन कॉल्सवरून पोलिसांनी वायनाडचा रहिवासी असलेल्या अनिल चाको याला ताब्यात घेतले. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याला पोलिसांत नेहमी हजेरीसाठी यावे लागते.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. या हत्येत सहभागी असलेल्या इतर चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. ड्रग्ज तस्करीत अडकलेल्या अनिल चाकोचे जेफशी शत्रुत्व होते.

अनिल चाको आणि त्याच्या मित्रांनी जेफला गोव्यात एका निर्जन टेकडीवर नेले. तिथे त्याची हत्या केली आणि गोव्यातून ते सर्व पसार झाले.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात अभ्यासासाठी ठेवलेले अवशेष जेफचेच असल्याचे सिद्ध करणे हे पोलिसांचे मुख्य काम होते. जेफच्या पालकांचा डीएनए पोलिसांनी गोळा केला आणि चाचणीसाठी पाठवला.

नातेवाईकांचा डीएनए आणि मृतदेहाचा डीएनए एकच असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्याची तयारी केली आहे.

त्याआधी पोलिस जेफच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांचाही जबाब घेतील. अटक करण्यात आलेले पाचही संशयित रिमांडवर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

Goa Fianance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

SCROLL FOR NEXT