Goa Tourist Drown: बुडणाऱ्या मैत्रिणीला वाचवायला गेला अन् बुडाला; मुंबईच्या पर्यटक तरूणाचा गोव्यात दुर्दैवी मृत्यू

चिंबल येथे दगडाच्या खाणीत दुर्घटना; गोव्याच्या पिकनिकसाठी आला होता सात जणांचा ग्रुप
Mumbai Tourist drowned in Goa
Mumbai Tourist drowned in Goa Dainik Gomantak

Goa Tourist Drown: मुंबईहून गोव्यात सात मित्र मैत्रिणींचा ग्रुप पिकनिकसाठी आला होता. यातील एकाचा गोव्यातील चिंबल येथे दगडाच्या खाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डेरिक राज (वय १९) असे या मृत तरूणाचे नाव आहे.

रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. शिरवण चिंबल येथील दगडाच्या खणीत हा मृत्यू झाला. या सात जणांपैकी एका मुलीने येथे पोहायला जायचे ठरवले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने ती गटांगळ्या खाऊ लागली.

Mumbai Tourist drowned in Goa
Goa Weather: गोव्यातील जंगलात कारवीच्या फुलांमध्ये घट; राज्याच्या भेडसावणार हवामान बदल?

तिला बुडण्यापासून वाचविण्यासाठी डेरिक आणि आणखी एका मित्राने पाण्यात उडी मारली आणि त्या मैत्रिणीला वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांनी तिला सुखरूप वाचवले देखील. पण तथापि, दुसरा मित्र काठावर आला पण डेरिकला परत माघारी येणे जमले नाही.

दरम्यान, रात्री अग्निशमन दलाने रात्री उशिरापर्यंत शोधमोहिम राबवली. पण त्यांना डेरिकचा मृतदेह आढळून आलला नाही. शोधकार्यात अंधाराचा अडथळा होता, त्यामुळे आज सोमवारी पुन्हा येथे शोधकार्य राबविण्यात येणार आहे.

गोव्यात सध्या पर्यटन हंगाम जोरात सुरू आहे. देशविदेशातून पर्यटक गोव्याकडे धाव घेत आहेत.

गोव्यात फिरताना जिथे माहिती नाही, पाण्याचा अंदाज नाही, अशा ठिकाणी जाण्याचे धाडस काहीजण करतात, त्यातून अशा घटना घडत आहेत. काही दिवसांपुर्वीच गोव्यात दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com