Prayagraj-Goa Flight: प्रयागराज ते गोवा थेट विमानसेवा सुरू होणार? विमान कंपन्या करणार सर्व्हे

इंडिगो, अकासा, एअर इंडिया या कंपन्यांनी दाखवले स्वारस्य
Prayagraj-Goa Flight
Prayagraj-Goa FlightDainik Gomantak

Prayagraj to Goa direct Flight: गोव्यात मोपा येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आले आहे.

या काळात देशातील अनेक महत्वाची शहरे आणि परदेशातीलही अनेक ठिकाणी गोव्याशी थेट विमानसेवेने जोडली गेली आहेत. त्यात आता देशातील आणखी एका महत्वाच्या शहराची भर पडू शकते.

उत्तर प्रदेशातील महत्वाचे शहर असलेल्या प्रयागराज येथून गोव्याला थेट विमान सेवा सुरू होऊ शकते. त्यासाठी इंडिगो, अकासा आणि एअर इंडिया या विमान कंपन्यांनी रूची दाखवली आहे.

या कंपन्या या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याबाबत सर्व्हे करणार आहेत. या तिन्ही कंपन्यांनी प्रयागराजमधून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Prayagraj-Goa Flight
IFFI Goa 2023: 'ही' अभिनेत्री करणार 'इफ्फी'च्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन

प्रयागराजमधून गोव्यासाठी सध्या वास्को द गामा एक्सप्रेस ही एक रेल्वेगाडी आहे. जी आठवड्यातून एकदा धावते. पण ही रेल्वे पाटणा येथून येत असल्याने या रेल्वेतील तिकिट प्रयागराजच्या प्रवाशांना सहज मिळत नाही, असे होते.

तिकीटासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्यामुळेच विमान कंपन्यांनाही प्रयागराज ते गोवा थेट फ्लाईटसाठी इच्छुक आहेत.

काही महिन्यांपुर्वीच वाराणसी ते गोवा ही थेट फ्लाईट सुरू करण्यात आली आहे. ही फ्लाईट आठवड्यातून तीन दिवस असते. प्रयागराजमधूनही गोव्याला थेट फ्लाईट सुरू झाली तर ती देखील आठवड्यातून तीन दिवस असेल.

Prayagraj-Goa Flight
Konkan Railway: गोव्यात करा ख्रिसमस, न्यू ईयरचे सेलिब्रेशन; कोकण रेल्वेतर्फे धावणार विशेष रेल्वेगाड्या

एयरपोर्ट सल्लागार समितीच्या चेअरमन आणि खासदार केशरी देवी पटेल यांनी सांगितले की, गोव्यासाठी थेट फ्लाईट सुरू करण्यासाठी विमान कंपन्या उत्सुक आहेत. त्यासाठी रूट सर्व्हेचे काम होईल.

महाकुंभच्या आधी हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, जयपूर, गुवाहाटी आणि जम्मू या ठिकाणीही प्रयागराज येथून थेट विमानसेवा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com