Siolim Theft Case Dainik Gomantak
गोवा

Siolim Theft Case: 3 महिन्यांपूर्वी झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपीला अटक; हणजूण पोलिसांची कारवाई

24 जून रोजी SFX हायस्कूलजवळ अज्ञात व्यक्तीने टेम्पो चालकाला थांबवून त्याच्या खिशातील 40 हजाराची रक्कम हिसकावून स्कूटरवरून पळ काढला.

गोमन्तक डिजिटल टीम

Siolim Crime शिवोली येथे टेम्पो चालकाला गंडवून त्याच्याकडून रोख रक्कम हिसकावून पळालेल्या ऍगोस्टिनहो कार्व्हालो या आरोपीला पकडण्यात हणजूण पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई म्हापसा SDPO जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली.

या संबंधी म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हा 407 टेम्पोचा चालक असून तो त्याच्या हेल्परसह शिवोली, मांद्रे, मोरजी तसेच हरमल या भागात दूध पिशव्यांची विक्री करत असे.

24 जून 2023 रोजी सकाळी 8 च्या सुमारास टेम्पोचालक SFX हायस्कूलजवळ पोहोचल्यावर अ‍ॅक्टिव्हा स्कूटरने आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने चालकाला टेम्पो थांबवण्यास सांगून त्याच्या सोबत हुज्जत घालून फिर्यादीच्या खिशातील रोख 40 हजाराची रक्कम हिसकावून स्कूटरवरून पळ काढला.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ भादंवि 356, 379 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासा दरम्यान फिर्यादीला गुन्हेगाराची छायाचित्रे दाखवताच त्याने माजोर्डा येथील रहिवासी असलेला अगोस्टिनहो कार्व्हालो याची ओळख पटवली.

त्या नंतर पोलिसांनी एक विशेष टीम टायर करून आरोपी ऍगोस्टिनहो कार्व्हालो, (वय 40 वर्षे रा/ओ एच क्रमांक 53-ए, गोम्स वॉर्ड, माजोर्डा, साल्सेट, गोवा) या आरोपीला अटक करत त्याच्याकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली GA 11 J 0863 क्रमांकाची अ‍ॅक्टिव्हा स्कूटर पोलिसांनी जप्त केली.

घटनेचा पुढील तपास म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी आणि एसपी नॉर्थ बोस्युइट डिसिल्वा यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

SCROLL FOR NEXT