Benaulim Accident: गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक बाणावली येथे उलटला, सुदैवाने जीवित हानी नाही

ट्रक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याशेजारच्या विजेच्या खांबाला जाऊन धडकला
Benaulim Accident
Benaulim AccidentDainik Gomantak

Benaulim Accident बाणावली येथील मारिया हॉलजवळ घरगुती वापराचे गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली असून या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

ट्रक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याशेजारच्या विजेच्या खांबाला जाऊन धडकला आणि पलटी झाल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.

या अपघाताची भीषणता एवढी होती की, ट्रकच्या धडकेने विजेचा पोल मधून वाकून पूर्णतः मोडला आहे. तसेच विजेच्या तारा देखील अस्ताव्यस्त पडल्या असून घटनास्थळी गॅस सिलिंडर पडले होते.

Benaulim Accident
Ponda Free legal Aid Cell: मोफत मिळवा कायदेविषयक सल्ला, साळगावकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुरु केली लिगल सेल

या घटनेची पोलीस चौकशी तसेच पंचनामा झाला आहे का? या बद्दल अद्याप सविस्तर माहिती मिळाली नसून ही बातमी अपडेट करीत आहोत.

दरम्यान सध्या राज्यात अपघातांचे सत्र वाढत चालले असून वाहतुकीचे नियम न पाळल्याने बहुतांशी अपघात होत असल्याचे समजतेय.

भरधाव वेगावर नियंत्रण ठेऊन वाहनचालकांना जरब बसावी यासाठी वाहतूक पोलिसांमार्फत गर्दीच्या ठिकाणी तसेच महामार्गांवर cctv बसवण्यात आले आहेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com