Goa Crime   Gomantak Digital Team
गोवा

Goa Crime : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

पीडित मुलीला आमिषे दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : रायबंदर व मडगाव येथील भागात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी संबंधित क्षेत्रातील पोलिस स्थानकांत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या संशयितांना अटक करण्यात आलेली नाही. पीडित मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी त्यांची जबानी एनजीओच्या उपस्थितीत नोंद केली आहे. संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.

रायबंदर येथील मंजुनाथ रमेश अथोले (२०) याने पीडित मुलीला आमिषे दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणाची तक्रार मुलीने पणजी महिला पोलिस स्थानकात बुधवारी (ता.२४) दाखल केली होती. तपास अधिकारी तथा उपनिरीक्षक मनीषा म्हार्दोळकर यांनी एनजीओच्या उपस्थितीत पीडित मुलीची जबानी नोंदवून बलात्कार, बाल कायद्याच्या कलम ८(२) तसेच पॉक्सो कायदाच्या कलम ४ खाली गुन्हा दाखल केला आहे.

संशयित मंजुनाथ हा मूळचा हवेरी-कर्नाटक येथील असून सध्या तो रायबंदर येथे राहत होता. गोमीसवाडा-माजोर्डा येथे राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला संशयित राहुल चंद्रा (२८) याने आमिषे दाखवून तो घरातून घेऊन जात होता. मडगाव येथील एका फ्लॅटमध्ये नेऊन त्याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याने ती गरोदर राहिली. ही गोष्ट आपल्या आईवडिलांना सांगण्यास ती अल्पवयीन मुलगी घाबरत होती.

एनजीओच्या उपस्थितीत पीडितेची जबानी

अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्याने पीडितेच्या आईने मडगाव पोलिस स्थानकात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला आहे. संशयित राहुल हा मूळचा पश्‍चिम बंगाल येथील असून त्याची ओळख पीडित मुलीशी झाली होती. मडगाव पोलिसांनी एनजीओच्या उपस्थितीत पीडित मुलींची जबानी नोंदवून बलात्कार, बाल कायद्याच्या कलम ८(२) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४ खाली गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT