Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: लिफ्ट मागण्याच्या सवयीने रूपा पारकरचा 'घात'

मारेकऱ्याला अटक: सोन्यासाठीच खून

दैनिक गोमन्तक

केपे: करमणे-सावर्डे येथील रूपा पारकर (55) या महिलेच्या खूनप्रकरणी संशयिताला पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. रूपा हिला लिफ्ट मागून घेत प्रवास करण्याची सवय होती. ही सवयच तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. लिफ्ट देण्याच्या बहाण्यानेच संशयिताने तिला वाहनात बसवले आणि तिच्यावर हल्ला करून तिचे सोने पळवल्याची माहिती मिळाली.

याप्रकरणी पोलिसांनी हुसेन खान (38, रा. कुडचडे-काकोडा) याला अटक केली असून या प्रकरणात वापरलेली सुमो गाडीही जप्त करण्यात आली आहे. 6 मे रोजी रूपा हिचा मृतदेह गुड्डेमळ-सावर्डे येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला जंगलात आढळला होता. मृतदेहाची ओळख दुसऱ्या दिवशी पटली. पण रूपाचा खून कुणी आणि का केला, हे प्रश्न अद्याप अनुत्तरितच होते. कुडचडे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कसून चौकशी केली.

यासाठी खास चार शोध पथके तयार केली होती. खुन्याचा तपास लागत नसल्याने वरिष्ठ पोलिस अधिकारीही कुडचडे पोलीस स्थानकात ठाण मांडून बसत होते. पोलिसांनी या खुनाचा तपास लावण्यासाठी बऱ्याच लोकांच्या जबानी घेतल्या. फॉरेन्सिक तुकडीने मृतदेह मिळालेल्या ठिकाणची आणि रूपाच्या घराची तपासणी केली होती. हुसेन हा कुडचडेतील एका कारखान्यातील गाडीवर चालक म्हणून काम करतो. रूपाने त्यादिवशी त्याच्याकडे लिफ्ट मागितली. त्यावेळी त्याची गाडी खूप पुढे गेली होती. मात्र, तिच्या अंगावरील दागिने पाहून हुसेनने गाडी मागे घेतली आणि तिला लिफ्ट दिली. थोडे अंतर पुढे गेल्यावर गाडीचे चाक पंक्चर झाल्याचा बहाणा करत तो खाली उतरला आणि लोखंडी सळीने हुसेनने तिच्यावर हल्ला केला. नंतर जंगलात तिचा मृतदेह टाकून, दागिने घेऊन तो पसार झाला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT